Maratha Reservation : घोषणा, भाषणं नाही, लढावच लागणार; उद्यापासून जरांगे पुन्हा सत्ताधाऱ्यांना घेरणार

Maratha Reservation :  घोषणा, भाषणं नाही, लढावच लागणार; उद्यापासून जरांगे पुन्हा सत्ताधाऱ्यांना घेरणार

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation ) मुद्दा चांगलाच पेटला आहे. त्यात आरक्षणासाठी मनोज जरांगे हे राज्यातील ठीक ठिकाणी सभा घेत आहे. आरक्षणासंदर्भात जरांगे यांनी सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. हा अल्टिमेटम आज संपला असून उद्यापासून पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात यांनी रणशिंग फुंकले आहे. आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत सरकारला जेरीस आणून सोडणार मनोज जरांगे यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या चौंडी येथे दिला.

Maratha Reservation : ‘सरकारच्या छाताडावरच बसणार’; जरांगे पाटलांचा सरकारला कडक शब्दांत इशारा

आरक्षणासाठी आतापर्यंत केवळ आश्वासन देण्यात आले जे सत्तेत नाही त्या आरक्षण देण्याचा आश्वासन देतात ते सत्तेत आले व दुसरे सरकार पडलं सरकार पुन्हा आम्ही आरक्षण मिळवून देऊ आम्हाला सत्ता द्या अशी मागणी करतात. मात्र घोषणा देऊन भाषणे देऊन नाही तर त्यासाठी लढा द्यावाच लागणार. धनगर समाजाला देखील आरक्षण हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला देखील याशिवाय पर्याय नाही.

Vladimir Putin : पुतिन एकदम फिट अँड फाईन; हार्टअटॅकच्या केवळ अफवा, क्रेमिनिलचा दावा

सरकारला दिलेल्या आमचा आज शेवटचा दिवस आहे त्यांना जाग येते की नाही. धनगर समाजाला आरक्षण हवे असेल समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे आवश्यकता आहे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आज प्रतिपादन यावेळेस मनोज जरांगे यांनी केलं.

मला गद्दारी करण्याचा चान्स होता

चौंडी मनोज जरांगे यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार टीका केली. बोलताना ते म्हणाले की, ठेवून तिला तर आरक्षण मिळणार नाही. मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो. माझ्याजवळ अख्ख मंत्रिमंडळ येऊन बसलं होतं. मला गद्दारी करण्याचा चान्स होता. मात्र मी माझ्या जातीशी प्रामाणिक होतो मला माझ्या समाजासाठी लढा द्यायचा होता असं देखील यावेळी जरांगे म्हणाले.

अल्टिमेटम संपला उद्यापासून पुन्हा शासनाला धारेवर धरणार

आरक्षणा शासनाने मागितलेल्या 40 दिवसांचा अल्टिमेटम संपला. आज मनोज जरांगे यांनी प्रशासनाल कडकशब्दात इशारा दिला आहे. ते सारखं म्हणतायेत अभ्यास चालू आहे अभ्यास चालू आहे मात्र एवढं करू नये त्यांना अजूनही पर्याय सुचना. उद्यापासून आम्ही शांततेचे युद्ध पुकारला आहे.

आरक्षणासाठी लढा राजकारण आणू नका

निवडणुकीच्या आदी आरक्षण अनु या तयारी मध्ये राहू नका 50 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. त्यानुसार तयारीला लागा. आज विजयादशमीची शपथ घ्या घरोघरी जा. लढा द्या मात्र लढा देताना जात म्हणून लढा राजकारण म्हणून नको. कांदा, बटाटे चिन्ह वगैरे हे काय राजकारण घेऊन येऊ नका तुम्ही एकत्र आलात तरच आरक्षण मिळेल.

50 दिवसांची वाट बघू नका

आरक्षणासाठी तुम्ही 50 दिवसांची मुदत दिली आहे मात्र 50 दिवसांची वाट बघू नका कारण काही दिवसांची मुदत दिली होती. मात्र मी पाहतायत म्हणूनच तुमचे 50 देखील असेच होतील की, काय म्हणून शांत बसू नका. उद्यापासून सुरुवात करा. आरक्षण मिळणार नसेल तर तुम्ही देखील आमच्या दारात यायचं नाही अशा स्पष्ट शब्दात मनोज जारंगे यांनी सरकारला इशारा दिला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज