रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी राजघाटावर महात्मा गांधींसाठी काय लिहिले? पत्र व्हायरल
Vladimir Putin On Mahatma Gandhi : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून आज 5 डिसेंबर रोजी त्यांनी राजघाटला
Vladimir Putin On Mahatma Gandhi : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून आज 5 डिसेंबर रोजी त्यांनी राजघाटला भेट देत भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहल्यानंतर पुतिन यांनी अभ्यागतांच्या पुस्तकात गांधीजींबद्दलचे आपले विचार लिहिले. त्यात पुतिन यांनी गांधीजींना आधुनिक भारताचे संस्थापक म्हणून वर्णन करत लिहिले की महात्मा गांधींनी जागतिक शांतीचा संदेश दिला.
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी लिहिले की, आधुनिक भारतीय राज्याच्या संस्थापकांपैकी एक, एक महान विचारवंत आणि मानवतावादी महात्मा गांधी यांनी जागतिक शांततेच्या कार्यात मोठे योगदान दिले आहे. त्यांचे स्वातंत्र्य, नैतिकता आणि मानवतेबद्दल विचार आजही प्रासंगिक आहेत असं राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी लिहिले आहे.
पुढे त्यांनी लिहिले की, आज जग ज्या नवीन आणि अधिक न्याय जागतिक व्यवस्थेचे साक्षीदार आहे हे महात्मा गांधी यांचे विचार होते. त्यांनी आपल्या विचाराच्या माध्यमातून भविष्यातील जगाचे स्वप्न दाखवले. आज राष्ट्रे एकमेकांचे हित लक्षात घेऊन समानता, परस्पर आदर आणि सहकार्याच्या तत्त्वांवर आधारित संबंध निर्माण करतात असे महात्मा गांधी यांचे विचार होते. ही तत्त्वे रशिया आणि भारताच्या मैत्री आणि भागीदारीचा पाया आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला एकमेकांच्या जवळ आणत राहतात.
तर दुसरीकडे महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांना आदरांजली वाहण्यापूर्वी पुतिन राष्ट्रपती भवनात पोहोचले होते. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी त्यांचे स्वागत केले. राष्ट्रपती भवनात त्यांना गार्ड ऑफ ऑनर देऊन सन्मानित करण्यात आले.
SMAT 2025 : मोहम्मद शमीची शानदार कामगिरी, 4 विकेट घेत भारतीय संघात कमबॅकसाठी ठोकला दावा!
प्रथम, रशियन राष्ट्रगीत वाजवण्यात आले, त्यानंतर भारतीय राष्ट्रगीत वाजवले गेले. त्यानंतर, राष्ट्रपती पुतिन यांनी गार्डची पाहणी केली आणि सन्मान स्वीकारला. गुरुवारी संध्याकाळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात आले, जिथे पंतप्रधान मोदी त्यांचे स्वागत करण्यासाठी स्वतः विमानतळावर पोहोचले होते.
