महात्मा गांधी-लालबहादूर शास्त्रींना भव्य चित्रांद्वारे मानवंदना! जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा अनोखा उपक्रम
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने एक अनोखा उपक्रम राबविला.

Jadhavar Group Institutes Tribute : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने एक अनोखा उपक्रम राबविला. तब्बल 40 बाय 80 फूट आकारातील भव्य चित्रांद्वारे जवळपास 200 विद्यार्थ्यांनी या राष्ट्रपुरुषांना मानवंदना व्यक्त केली. देशाच्या जडणघडणीत अमूल्य योगदान देणाऱ्या महापुरुषांची आठवण जागवण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचा संदेश पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा विशेष उपक्रम राबविण्यात आला.
राष्ट्रपुरुषांना मानवंदना
राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) आणि लालबहादूर शास्त्री यांच्या (Lal Bahadur Shastri) जयंतीनिमित्ताने 40 बाय 80 फूट आकारातील भव्य चित्रांद्वारे तब्बल 200 विद्यार्थ्यांनी या राष्ट्रपुरुषांना मानवंदना दिली. देशाच्या जडणघडणीमध्ये मोठे योगदान देणा-या या राष्ट्रपुरुषांना न-हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट (Jadhavar Group) तर्फे अनोखी मानवंदना देण्यात आली.
विशेष मार्गदर्शन
संस्थेच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात 20 बाय 40 फूट आकारातील दोन भव्य चित्रे काढण्यात (Pune News) आली होती. याकरिता मागील एका आठवड्यापासून 200 विद्यार्थी तयारी करीत होते. संस्थेचे उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर यांनी याकरिता विशेष मार्गदर्शन केले.
सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम
अॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात या राष्ट्रपुरुषांनी केलेले कार्य आजच्या पिढीपर्यंत पोहोचावे, याकरिता हा उपक्रम राबविण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने वेगळा उपक्रम व्हावा, या संकल्पनेतून उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. 40 बाय 80 फूट आकारात दोन भव्य चित्रे साकारण्याकरिता त्या चित्राचे वेगवेगळे प्रत्येकी50 भाग करण्यात आले आणि नंतर ते एकमेकांना जोडण्यात आले. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटतर्फे सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात.