Mahatma Gandhi : इंडिया आघाडीच्या ‘मी पण गांधी’चं टीझर लाँच!, उद्या पदयात्रेचं आयोजन

Mahatma Gandhi : इंडिया आघाडीच्या ‘मी पण गांधी’चं टीझर लाँच!, उद्या पदयात्रेचं आयोजन

Mahatma Gandhi : गेल्या काही वर्षात देशामध्ये अनेक लोकशाहीला घातक अशा अऩेक घटना घडामोडी घडल्या. अनेकदा विरोधकांनी याविरोधात आवाजही उठवला. राष्ट्रपिता महात्मा गांधींजींच्या ( Mahatma Gandhi) देशात त्यांच्याविषयी गरळ ओकळी जाते. मात्र, गरळ ओकणाऱ्यांवर कुठलीही कारवाई होत नाही. दरम्यान, उद्या राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री (Lal Bahadur Shastri) यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने I.N.D.I.A. आघाडीच्या सर्व घटक पक्षांतर्फे मुंबईत पदयात्रेचं आयोजन केलं आहे. त्यासाठी ‘मी पण गांधी’ असं टीझर लॉंच करण्यात आलं आहे.

मुंबई कॉंग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर मी पण गांधींचा टीझर लॉंच करण्यात आला आहे. 54 सेकंदाच्या टीझरमध्ये देशातील समकालीन परिस्थितीवर भाष्य करत सत्ताधारी पक्षावर टीका केली आणि गांधींच्या मार्गावर चाललं तर देशाची सुटका होऊ शकते. टीझरमध्ये सुरूवातीच्या काही सेकंदामध्ये दिसतं की, धार्मिक आणि जातीय तेढ, संविधानची तोडमोड, महापुरुषांचा अवमान, हिटलरशाही, इतिहासाचं विद्रुपीकर, जुमलेबाजी, सत्तेचा घोडेबाजार, गलिच्छ राजकारण, पत्रकारांची मुस्कटदाबी, सत्तांधळेपणा यामधून देशाची सुटा होऊ शकते का ? असा सवाल केला.

वॉर्नर म्युझिकचे ‘कमिंग होम’ अॅंथमने अमेरिकेत रचला इतिहास, 1 दशलक्ष लोकांच्या उपस्थित लॉंचिंग सोहळा… 

दरम्यान, याचं उत्तरही याचं टीझरमध्ये मिळंत. यात टीझरमध्ये विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर हो, दिलंय असून त्यासाठी राष्ट्रपित्याने दाखवेल्या मार्गावरून चालू या..मुंबईतील ऑक्टोबरला होणाऱ्या पदयात्रेत सहभाी होऊया, असं आवाहन या टीझरमध्ये करण्यात आलं.

सध्या देशात ‘फोडा आणि राज्य करा’ असं राजकारण केल्या जातं आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात ज्या द्वेषाच्या घटना घडत आहेत. याला विरोध करून समाजात सद्भावना निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी I.N.D.I.A. ने २ ऑक्टोबरला महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त इंडिया आघाडी ‘मी पण गांधी’चा नारा देणार आहे.

गांधीवादी विचारांना दडपण्याच्या प्रयत्नांना रोखण्यासाठी या पदयात्रेचं मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीने आजोजन केलं आहे. त्याला आघाडीतील इतर घटक पक्षांचाही पाठिंबा मिळाला आहे. या पदयात्रेत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही I.N.D.I.A. च्या नेत्यांनी केलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube