व्लादिमीर पुतिन यांची मोठी घोषणा, बॅलेस्टिक मिसाइल डागले तर होणार अण्वस्त्र हल्ला, जगात खळबळ

  • Written By: Published:
व्लादिमीर पुतिन यांची मोठी घोषणा, बॅलेस्टिक मिसाइल डागले तर होणार अण्वस्त्र हल्ला, जगात खळबळ

Vladimir Putin :  रशिया आणि युक्रेन (Russia and Ukraine) यांच्यात सुरु असलेल्या युद्धाला एक हजार दिवस पूर्ण झाले आहे. आतापर्यंत या युद्धामध्ये हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) नवीन करारावर स्वाक्षरी केली. या नवीन करारानुसार ज्या देशाकडे अणुशक्ती नाही अशा देशाने जर अणुशक्ती असलेल्या देशाच्या पाठिंब्याने रशियावर हल्ला केला तर तो रशियाविरुद्ध युद्धाची घोषणा मानला जाईल आणि जर रशियाविरुद्ध बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर केल्यास प्रत्युत्तर म्हणून अण्वस्त्र हल्लाही केला जाऊ शकतो. अशी माहिती रशियाकडून देण्यात आली आहे.

माहितीनुसार, पुतिन यांनी त्यांच्या देशाच्या आण्विक सिद्धांतात हा बदल केला आहे. जेणेकरून युक्रेनला पाठिंबा देणारे देश त्यावर हल्ला करू शकत नाहीत. अमेरिका आणि अनेक युरोपीय देशांनी अलीकडेच युक्रेनला लांब पल्ल्याची शस्त्रे वापरण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर पुतिन यांनी हे पाऊल उचलले आहे.

पुतिन यांनी केलेले इतर बदल

रशियाविरुद्ध कोणत्याही देशाने ड्रोन हल्ला केल्यास त्याला अणुऊर्जेच्या स्वरूपात प्रत्युत्तरही दिले जाऊ शकते. रशियन सैन्य अशा हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देईल. याच बरोबर जर कोणतेही शस्त्र रशियाच्या सीमा ओलांडून हवाई किंवा अंतराळातून आले तर ते रशियाविरुद्ध युद्ध मानले जाईल. अशा परिस्थितीत रशिया अण्वस्त्रांचा वापर करू शकतो. तर दुसरीकडे जर रशियाला वाटत असेल की आपला देश आणि लोक धोक्यात आहेत, तर तो आण्विक क्षेपणास्त्रे आणि क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा देखील तैनात करू शकतो. जेणेकरून शत्रूच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देता येईल आणि अंतराळातून हल्ला झाल्यास रशिया आपली क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली सक्रिय करेल. अंतराळातही हल्ले केले जाऊ शकतात. या प्रकारच्या हल्ल्यात न्यूक्लियर डिटरन्सचाही वापर केला जाऊ शकतो.

रशियाने हे का केले?

अण्वस्त्र शक्ती असलेल्या देशांनी अण्वस्त्रे नसलेल्या देशासोबत मिळून रशियाविरुद्ध शस्त्रे वापरली तर तो रशियाविरुद्ध लष्करी धोका आहे. असं पुतीन यांना वाटत आहे. त्यामुळे असे धोके टाळण्यासाठी अण्वस्त्रांचा वापरही होऊ शकतो.

विनोद तावडेंची बॅग कोण तपासणार? उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल

रशियाच्या आण्विक प्रतिबंधक दलात जमीन, सागरी आणि हवाई दलांचा समावेश आहे. त्यामुळे आता  रशियाच्या विरोधात कोणी बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले तर रशिया त्याच्या विरोधात अण्वस्त्रांचाही वापर करू शकतो, असा इशारा रशियाने संपूर्ण जगाला दिला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube