व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराचा झटका; घरातच फरशीवर पडलेले आढळल्याने खळबळ

व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराचा झटका; घरातच फरशीवर पडलेले आढळल्याने खळबळ

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येत आहे. एका टेलिग्राम ग्रुपच्या संदर्भाने WION या वृत्तसंस्थेने यासंबंधीत वृत्त दिले आहे. ही बातमी द मिरर, जीबी न्यूज आणि द एक्सप्रेस या ब्रिटीश वृत्तपत्रांनी प्रकाशित केली आहे. (Russian President Vladimir Putin has suffered cardiac arrest. Media reports are claiming that he was found lying on the floor.)

WION ने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी रात्री 9.05 मिनिटांनी पुतिन हे त्यांच्या बेडरूमच्या जमिनीवर पडलेले आढळले. त्यांच्या सुरक्षा कर्मचार्‍यांना आवाज आल्यानंतर तातडीने डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. तात्काळ उपचार घेतल्यानंतर पुतिन यांना शुद्ध आली. यानंतर पुतिन यांना आरोग्य सुविधा उपलब्ध असलेल्या दुसऱ्या खोलीत नेण्यात आले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube