मोदींशी गळाभेट ते एकाच गाडीतून प्रवास; पुतीन यांच्या भारत दौऱ्याचे खास फोटो नक्की पाहा
Putin's India visit हे गुरूवारी संध्याकाळी भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुतीन हे 30 तास दौऱ्यादरम्यान भारतात असणार आहेत.
- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) हे गुरूवारी संध्याकाळी भारताच्या दौऱ्यावर आले आहेत.
- पुतीन हे 30 तास दौऱ्यादरम्यान भारतात असणार आहेत.
- पुतीन हे या दौऱ्यात 25 करारांवर सह्या करण्याची शक्यता आहे.
- पुतीन यांच्या या दौऱ्यामुळे नक्कीच दोन्ही देशांतील संबंध अधिक चांगले होतील.
-
त्याचप्रमाणे जागतिक स्तरावर अंतराळापासून ते व्यापारापर्यंतची दोन्ही देशांची ताकद वाढणार आहे.
-
पुतीन यांच्या भारत दौऱ्याच्या वेळापत्रकानुसार ते 5 डिसेंबरला सकाळी 11:50 वाजता हैद्राबाद हाऊसमध्ये (Hydrabad House) पंतप्रधान मोदींची (PM Narendra Modi) भेट घेतील, जिथं दोन्ही देशांचे नेते 23 व्या भारत-रशिया शिखर परिषदेचा भाग असतील.
- भारत आणि रशिया हे दोन्ही देश एकमेकांचे सर्वोत्तम मित्र म्हणून जगभरात सर्वश्रृत आहेत.
- पंतप्रधान मोदींनी (PM Modi) 2014 मध्ये पहिल्यांदा पुतिन यांना सांगितले होते की, भारतातील प्रत्येक मुलाला माहित आहे की, रशिया आमचा सर्वात चांगला मित्र आहे.








