इस्रायल-इराण युद्धाचा जगावर परिणाम होणार, या दहा गोष्टी बदलणार ?
Iran–US–Israel war -Iran–US–Israel war -त्यामुळे आता इराणने अमेरिकेला मदत करणाऱ्या इतर देशावंर हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे पश्चिम आशियामध्ये युद्ध भडकले आहे.
Iran–US–Israel war impact on World: अमेरिका-इस्रायलने (Israel) इराणवर (Iran) हल्ला केल्यानंतर मध्य-पूर्वेमध्ये युद्ध भडकले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामोनी यांचा हल्ल्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता इराणने अमेरिकेला मदत करणाऱ्या इतर देशावंर हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे पश्चिम आशियामध्ये युद्ध भडकले आहे. या युद्धाचा परिणाम जगाला भोगावे लागणार आहेत.
जगावर हे दहा परिणाम होतील ?
1) तेल आणि गॅसच्या किमती वाढतील
या युद्धामुळे जगभरात तात्पुरते ऊर्जा संकट निर्माण होईल. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती वाढू शकतात.
2) महागाईचा धोका
इंधनाच्या किमती वाढल्या तर त्याचा थेट परिणाम वाहतूक, अन्न आणि औषधांवर होईल.
3) मध्य पूर्वेतील संकट
हे युद्ध आणखी भडकले तर त्याचा परिणाम संपूर्ण मध्य पूर्वेवर होईल. इराणने अमेरिकेला मदत करणाऱ्यांना आठ देशांवर हल्ला केलाय. त्यामुळे पश्चिम आशियातील परिस्थिती बिघडली आहे. अमेरिका, इस्रायल हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इराणचे मित्र राष्ट्र हिजबुल्लाह आणि हुथी सक्रिय होऊ शकतात. यामुळे युद्ध इस्रायल, लेबनॉन आणि येमेनमध्ये पसरू शकते.
4) अमेरिका मध्य पूर्वेत लष्करी कारवाया वाढवेल
इराणवर हल्ला करण्यापूर्वी अमेरिकेने अनेक देशांमध्ये आपले लष्करी तळ निर्माण केले आहेत. त्या ठिकाणी हवाई, नौदल व सैनिक तैनात केले आहेत. सुमारे चाळीस हजार सैनिक या तळांवर आहेत. त्यामुळे संघर्ष आणखी वाढल्यास अमेरिका मध्य पूर्वेत लष्करी कारवाया वाढवेल.
5) इराण अण्वस्त्र निर्मिती मोहीम तीव्र करेल
अमेरिकेने इराणला अण्वस्त्रे विकसित करू नयेत असे सातत्याने आवाहन केले होते. त्यावरूनच इराणवर हल्ला झाला आहे. त्यामुळे भविष्यातील शस्त्र सज्जता म्हणून इराण अण्वस्त्र विकसित करू शकतात.
6) रशिया, चीन आणि भारताची भूमिका काय?
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला आहे. त्यात मध्य पूर्वेतील अनेक मुस्लिम देशांचा अमेरिकेला मूक पाठिंबा आहे. पण मध्य-पूर्वे संघर्षात चीन, रशिया, भारत यांची ठोस भूमिका नाही. या तिन्ही देशांची भूमिका भविष्यात महत्त्वाची असणार आहे.
7) इंधनाचे दर भडकणार
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून कच्चा तेलाची आयात होते. हा मार्ग बंद पडला तर जगातील तेलाच्या व्यापाऱ्यावर वीस ते टक्के परिणाम होऊ शकते. एकटा भारत या मार्गातून तीस ते चाळीस टक्के तेल आयात करतो.
8) जगभरातील बाजार कोसळतील
या युद्धाचा थेट परिमाण महागाईवर होईल. या भू राजकीय संघर्षाचा परिणाम जगाच्या बाजारावर होईल. तेल आणि ऊर्जा-संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होऊ शकते. युद्धाच्या भीतीमुळे गुंतवणूकदार शेअर बाजारातील गुंतवणूक काढून घेतातत. ज्यामुळे बाजारपेठेत अस्थिरता निर्माण होते.
9) निर्वासितांचे मोठे संकट
युद्धाचा आणखी भडका उडू शकतो. त्यातून इराण आणि शेजारील देशांमधून लाखो लोक युरोप आणि आशियातील इतर देशात स्थलांतर करतील. त्यामुळे अनेक देशांमध्ये निर्वासितांचे संकट निर्माण होऊ शकते.
10) संयुक्त राष्ट्रांचा प्रभाव (UN) किती दिसला ?
या युद्धाने संयुक्त राष्ट्रांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल. कारण अमेरिकेने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केलंय. या युद्धाने संयुक्त राष्ट्रांचा प्रभाव कमी झाला आहे.
———————-
इराण-इस्रायल युद्धाचा भारताला फटका बसणार ?
इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे पश्चिम आशियात तणाव वाढला आहे. दोन्ही देशात युद्ध भडकले आहेत. त्याचा परिणाम जगावर होणार आहे. भारताला मोठा फटका बसू शकतो.
भारताचा इराणबरोबर व्यापार कसा होतो ?
इराणसोबत भारताचा व्यापार 1.68 अब्ज डॉलरचा
बासमती तांदूळ, चहा, साखर, फळे, मांस, औषधे, औद्योगिक यंत्रसामग्रीची निर्यात
सफरचंद, पिस्ता, खजूर, खनिजे, खते, बांधकाम साहित्य, काचेच्या वस्तू, धातूंची आयात
भारताचा इराणबरोबर व्यापार कमी का झाला ?
2018-19 मध्ये भारत 17.03 अब्ज डॉलरचा व्यापार करत होता
आता केवळ 1.68 अब्ज डॉलरचा व्यापार
अमेरिकेने कच्च्या तेलाच्या आयातीवर निर्बंध घातल्याने व्यापार घटला
भारतावर कोणता परिणाम होणार ?
होरमुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग
हा वाहतूक मार्ग बंद झाल्यास भारतावर थेट परिणाम
या मार्गावरून भारत 40 ते 50 टक्के कच्च्या तेलाचे आयात करतो
युद्धाच्या काळात जहाजांचा विमा आणि भाडे 40 ते 50 टक्क्यांनी वाढू शकते
त्यामुळे कच्च्या तेलाची किंमती वाढून देशात इंधनाचे दर भडकतील
