ग्लाइड बॉम्ब, ड्रोन अन् मिसाईलने रशियाचा युक्रेनवर हल्ला 30 जखमी तर 6 जणांचा मृत्यू

  • Written By: Published:
ग्लाइड बॉम्ब, ड्रोन अन् मिसाईलने रशियाचा युक्रेनवर हल्ला  30 जखमी तर 6 जणांचा मृत्यू

Russia Attack On Ukraine : गेल्या अनेक दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध (Russia Ukraine War ) सुरू आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत हजारो लोक जखमी झाले आहे तर अनेक जणांचा मृत्यू देखील झाला आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार पुन्हा एकदा रशियाने (Russia) युक्रेनवर मोठा हल्ला केला आहे.

माहितीनुसार, रशियाने सोमवारी दक्षिण आणि पूर्व युक्रेनमधील (Ukraine) शहरांवर ग्लाइड बॉम्ब, ड्रोन आणि बॅलिस्टिक मिसाईलने हल्ला केला आहार. या हल्ल्यात आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर 30 जण जखमी झाले आहे.

याबाबत माहिती देताना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) म्हणाले की,रशिया केलेल्या हल्ल्यांमुळे दीर्घकाळ नागरी भागांवर परिणाम होत आहे. रशियाची ही कृती त्यांची युद्ध सुरु ठेवण्याची इच्छा दाखवत आहे. युद्धाला 1000 दिवस पूर्ण होत आहेत. असं देखील ते म्हणाले.

झेलेन्स्की यांनी टेलिग्राम मेसेजिंग ॲपवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “दररोज, प्रत्येक रात्री, रशिया समान प्रकारचा दहशत पसरवतो. नागरी वस्तूंना लक्ष्य केले जाण्याचे प्रमाण वाढत आहे.’ डोनाल्ड ट्रम्प जानेवारीत सत्तेवर आल्यानंतर वॉशिंग्टन युद्धविषयक धोरणात काय बदल करणार हे पाहण्यासाठी रशिया आणि युक्रेन दोघेही वाट पाहत आहेत. अमेरिका युक्रेनला लष्करी मदत देणारा सर्वात मोठा देश आहे, परंतु ट्रम्प यांनी कीवला अब्जावधी डॉलर्सची मदत दिल्याबद्दल बिडेन प्रशासनावर टीका केली आहे.

ग्लाईड बॉम्बने हल्ला

रशियन ड्रोनने दक्षिणेकडील मायकोलायव्ह शहरावर हल्ला केला. या हल्ल्यात पाच लोक ठार झाले आणि एक 45 वर्षीय महिला जखमी झाली आहे असं स्थानिक अधिकाऱ्यांनी माहिती दिली. या माहितीनुसार, हल्ल्यानंतर सुमारे 24 लोकांनी मनोवैज्ञानिक मदत मागितली आहे. तसेच या हल्ल्यात घरे आणि स्टोअरचे नुकसान झाले आहे. युक्रेनच्या राष्ट्रीय पोलिसांनी सांगितले की, दक्षिणेकडील झापोरोझ्येला रात्रभर तीन शक्तिशाली ग्लाइड बॉम्बचा फटका बसला, त्यात एकाचा मृत्यू झाला आणि 4 वर्षाच्या मुलासह 21 जण जखमी झाले.

विधानसभेत जाण्यासाठी आशीर्वाद द्या; विकासाची ग्वाही देत वळसे पाटलांची साद..

तर दुसरीकडे युक्रेनच्या गुप्तचर संस्थेने दावा केला आहे की त्यांनी मॉस्को क्षेत्रातील क्लिन-5 एअरफील्डवर उभे असलेले रशियन एमआय-24 हेलिकॉप्टर नष्ट केले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube