अबब! २५ वर ३४ शून्य, रशियाने गुगलवर लावला ‘इतका’ दंड; प्रकरण नेमकं काय?
Russia News : सोशल मीडियावर सध्या एका शिक्षेची जोरदार चर्चा सुरू आहे. या शिक्षेची रक्कम इतकी जास्त आहे की एखाद्या व्यक्तीच्या कल्पनाशक्तीच्याही पलीकडील आहे. ही रक्कम इतकी जास्त आहे की ऐकून तुम्ही अचंबित व्हाल. आता तुम्ही विचार कराल की इतकी मोठी रक्कम दंड म्हणून कुणी केली असेल. रशियानेच हा दंड गुगलवर लावला आहे. CNN न्यूजनुसार ही रक्कम २.५ अनडेसिलियन डॉलर इतकी आहे. ही रक्कम इतकी जास्त आहे की एकापुढे किमान ३४ शून्य लावावे लागतील. म्हणजेच जर विचार केला तर ही रक्कम 250000000000000000000000000000000000 डॉलर इतकी होईल.
जर ही रक्कम भारतीय चलनात बदलायची झाली तर यातील शून्यांची संख्या आणखी वाढेल. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही रक्कम इतकी जास्त आहे की आजमितीस इतका पैसा संपूर्ण पृथ्वीवर देखील नाही. अख्ख्या जगाची जीडीपी देखील या आकड्याच्या जवळ पोहोचणार नाही असा दावा केला जात आहे. त्यामुळे रशियातील न्यायालयाने इतका मोठा दंड गुगलला का ठोठावला याची माहिती घेऊ या..
BRICS मध्ये पाकिस्तानची एन्ट्री? भारताचा मित्र रशियाच करतोय मदत; प्लॅनही रेडी..
गुगलवर रशियाने का लावला दंड
आता प्रश्न असा उपस्थित होतो की रशियाच्या न्यायालयाने गुगलवर इतका दंड का लावला आहे. यामागे नेमकं काय कारण आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मॉस्को टाइम्सच्या रिपोर्टनुसार हे प्रकरण युक्रेन आणि रशियात सुरू असलेल्या युद्धा (Russia Ukraine War) दरम्यानचं आहे. गुगलने क्रेमलिन (Google) समर्थक आणि सरकारी मिडिया आउटलेट्सच्या अकाउंट्सवर बंदी घातली होती आणि वारंवार सांगितल्यानंतरही बंदी मागे घेतली नव्हती. याच कारणामुळे रशियाने गुगलवर 2 अनडेसिलियन रुबलचा दंड ठोठावला आहे.
गुगलची पालक कंपनी अल्फाबेटचा २०२३ या वर्षातील महसूल ३०७ बिलियन डॉलर इतका होता. एक बिलियन डॉलरमध्ये साधारण ८४०० कोटी रुपये असतात. या हिशोबाने पाहिलं तर अल्फाबेटचं उत्पन्न ३०७ बिलियन डॉलर म्हणजेच २५,७८,८०० कोटी रुपये इतके होते. या उत्पन्नाचा विचार केला तरी रशियाने गुगलवर जो दंड ठोठावला त्याची भरपाई होणे अशक्यच आहे. अल्फाबेट आणि गुगल सारख्या मोठ्या कंपन्यांचे उत्पन्न जरी यात जोडले तरी देखील ही रक्कम अतिशय कमी भरते.
रशिया अन् चीनच्या मैत्रीचा जपानला धसका; जाणून घ्या, जपानच्या समुद्रात काय घडतंय?