रशिया अन् चीनच्या मैत्रीचा जपानला धसका; जाणून घ्या, जपानच्या समुद्रात काय घडतंय?

रशिया अन् चीनच्या मैत्रीचा जपानला धसका; जाणून घ्या, जपानच्या समुद्रात काय घडतंय?

China Russia Relation : चीन आणि रशियाने जपानी लोकांचं टेन्शन अनेक पटींनी (China Russia Relation) वाढविण्याचा प्लॅन तयार केला आहे. या दोन्ही देशांनी जपान समुद्रात संयुक्त सैन्य (Japan) अभ्यास सुरू केला आहे. मागील तीस वर्षांच्या काळातील हा सर्वात मोठा सैन्य अभ्यास असल्याचे सांगण्यात येत आहे. जपान समुद्र आणि उत्तरेकडील ओखोटस्क समुद्रात नोर्दर्न युनायटेड 2024 सैन्य अभ्यास होईल अशी माहिती चीनच्या संरक्षण मंत्रालयाने दिली होती. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या (Vladimir Putin) ओशिन 2024 अभियानाचा हिस्सा म्हणून या सैन्य अभ्यासाकडे पाहिले जात आहे. मीडिया रिपोर्ट्स नुसार या डीलमध्ये 400 वॉरशिप, सबमरीन आणि सपोर्ट वेसेल सहभागी होणार आहेत. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हा उपक्रम 16 सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे.

जपान भीतीपोटी ठेवतोय नजर

चीन आणि रशियाच्या या उपक्रमाने जपानचे टेन्शन वाढले आहे. जपानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की पाच चिनी जहाजे सुशिमा स्ट्रेट येथून जपानच्या समुद्राकडे जाताना दिसली आहेत. या जहाजांचे काही फोटो जपानच्या सुरक्षा दलांनी जारी केले आहेत. या जहाजांवर नजर ठेवली जात असल्याचेही सुरक्षा दलांनी स्पष्ट केले. सुशीमा स्टेट हा परिसर दक्षिण कोरिया (South Korea) आणि जपान यांच्या मध्यावर आहे. दक्षिण चीन समुद्र (South China Sea) आणि जपान यांना जोडण्याचे कामही हा परिसर करतो. असे असतानाही हा परिसर जपानच्या जल क्षेत्रात येत नाही.

‘इस्त्रायल धोक्यात येईल’, ‘पुतिन तुम्हाला खाऊन टाकतील’; ट्रम्प अन् हॅरिस यांच्यात घमासान

चीन रशिया मैत्रीची जपानला भीती का

चीनचे सातत्याने वाढत चाललेले लष्करी समर्थन आणि दक्षिण चीन समुद्राच्या फिलिपिन्स बरोबरील वादात चीनची वाढत्या आक्रमकतेने अमेरिका, जपानला हैराण केले आहे. 26 ऑगस्ट रोजी चीनच्या विमानांनी जपानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप जपानने केला होता. तसेच मागील आठवड्यात एका चायनीज नेवल शीपला आपल्या जल क्षेत्रात प्रवेशापासून विरोध करण्याचे काम जपानने केले होते.

जपानचा सध्या चीनबरोबर सेनकाकू बेटांवरून वाद सुरू आहे. तर होक्काइडो आणि कामचटका दरम्यान कुरील बेटांवरून रशियाबरोबर वाद सुरू आहे. याच कारणामुळे जपानच्या जल क्षेत्राजवळ चीन आणि रशियाच्या नौसैनिकांच्या हजेरीने जपानला घाम फुटला आहे.

रशिया युक्रेन बरोबर वाढला तणाव

फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला करून युद्धाला (Russia Ukraine War) सुरुवात केली. हे युद्ध अजूनही चालूच आहे. या काळात चीन आणि रशिया यांच्या संबंधात मोठी सुधारणा झाली. युद्धाच्या काळात चिनी राज्यकर्त्यांनी नेहमीच रशियाची पाठराखण केली. जपानने मात्र रशियावर निर्बंध लादणाऱ्या अमेरिका आणि त्याच्या सहकारी देशांबरोबर काम केले. या युद्धामुळे चीन आणि जपान यांचे संबंध जास्त आणि वेगाने खराब होत गेले.

साडेतीन हजार शाळांना कुलूप; शिक्षण विभागाच्या रिपोर्टने पाकिस्तानात खळबळ

चीन रशियाची मैत्री घट्ट होतेय..

युद्धाच्या काळात अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादले. पण याच काळात चीन रशियाचा मोठा सहकारी म्हणून पुढे आला. या निर्बंधांतून बाहेर पडण्यासाठी चीनने रशियाला मदत केली. मागील दोन वर्षांच्या काळात चीनने रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल आणि गॅस खरेदी केला आहे. काही महिन्यांपूर्वी अमेरिकी परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी दावा केला होता की चीन रशियाला हत्यारे देत नसला तरी घातक हत्यारे तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य मात्र देत आहे. रशिया सध्या 70 टक्के मशीन टूल्स आणि 90 टक्के मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स चीनकडून मागवत आहे. रशियाची मदत केली म्हणून अनेक चिनी कंपन्यांवर अमेरिकेने कठोर निर्बंध टाकले आहेत. परंतु यामुळे चीन आणि रशियाच्या मैत्रीवर काहीच परिणाम झालेला नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube