Ukraine Russia War : गाढ झोपेत असतानाच ड्रोन हल्ला; सहा लोकांचा मृत्यू, युक्रेनमध्ये अलर्ट
Russia Drone Attack on Ukraine : रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून (Ukraine Russia War) युद्ध सुरू आहे. दोन वर्षे झाले तरी देखील दोन्ही देशातील युद्ध संपलेले नाही. या युद्धात दोन्ही देशांचे अतोनात नुकसान झाले आहे. परंतु तरीही युद्ध थांबलेले नाही जगातील अनेक देश हे युद्ध थांबवावे म्हणून प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आलेले नाही. आताही या युद्धाची भूमीतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रशियाने काल रात्री युक्रेन मधील खार्कीव्ह या दुसऱ्या सर्वात मोठ्या शहरात ड्रोन हल्ला केला.
या हल्ल्यात सहा नागरिकांचा मृत्यू झाला तर दहा जण जखमी झाले आहेत. लोक घरात झोपलेले असतानाच हा हल्ला झाला. हल्ल्यानंतर सर्वत्र धावपळ सुरू झाली दोन हल्ल्याची माहिती राष्ट्रीय आपत्कालीन सेवा आणि शहराच्या महापौरांनी शनिवारी दिली. या घटनेने युक्रेनमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या हल्ल्यानंतर देशभरातील यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.
Russia : रशियाचा राष्ट्राध्यक्ष कोण? तीन दिवस चालणार मतदान; पुतिन यांचं पारडं जड
वृत्तसंस्था दिलेल्या वृत्तानुसार खार्कीव्हचे महापौर तेरेखोल यांनीही एका टेलिग्राम पोस्टद्वारे या हल्ल्याची माहिती दिली. या ड्रोन हल्ल्यात शहराच्या उत्तर भागातील शेवचेनकिवस्कीला खास लक्ष्य करण्यात आले. रशियाने ड्रोन हल्ला केला तो इराण निर्मित ड्रोन असल्याचा दावाही महापौर तेरेखोव यांनी केला आहे. या हल्ल्यात नऊ उंच इमारती तीन वस्तीगृहे आणि पेट्रोल पंप यांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
खारकीव्ह व पोलिसांनी दावा केला आहे की या हल्ल्यात जखमींमध्ये दोन महिला आणि सहा पुरुषांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त खारकीव्हच्या उत्तर पश्चिम सीमेवर असलेल्या माला डॅनी लिवका या गावातही वेगळा हल्ला झाला मात्र या हल्ल्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या हल्ल्याची काही छायाचित्रे पोलिसांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत.
Ukraine Russia War : विनाशकारी युद्धाला दोन वर्षे पूर्ण; शहरे उद्धवस्त, किती जीव गमावले?