अहिल्यानगरच्या भूमिपुत्रांचा रशियात बोलबाला! जागतिक अजिंक्य स्पर्धेत ‘सुवर्ण’ कामगिरी..
वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाकडून खेळताना अहिल्यानगरच्या भूमिपुत्रांची पदकांना गवसणी; भिंगार परिसरात या खेळाडूंचा सत्कार
The sons of Ahilyanagar are gaining influence in Russia : मॉस्को, रशिया येथे 4 ते 7 डिसेंबर दरम्यान वर्ल्ड रॉ पॉवरलिफ्टिंग फेडरेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाकडून खेळताना अहिल्यानगरच्या भूमिपुत्रांनी पदकांना गवसणी घातलीयं. या स्पर्धेत खेळाडू किशोर शिंदे याने 82.5 किलो मास्टर 1 कॅटेगिरी ओपन क्लासमध्ये सुवर्णपदक मिळवलंय. तर देवदत्त प्रविण गुंडू याने 125 किलो हेवी वेट कॅटेगिरी ओपन क्लासमध्ये रौप्य तर अमोल गायकवाड याने 100 किलो वेट कॅटेगिरी ओपन क्लासमध्ये रौप्यपदकाला गवसणी घातलीयं.
या यशाबद्दल भिंगार शहरातील स्कायलाईन कार केअरचे संचालक राहुल गायकवाड यांनी भिंगार परिसरात या खेळाडूंचा सत्कार करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी किरण गायकवाड, विकास गायकवाड, बंटी भिंगारदिवे, सृजन भिंगारदिवे, विलास जाधव आदी उपस्थित होते.
या क्षेत्रात आजपर्यंत असलेली मॉस्कोची मक्तेदारी मोडीत काढून या खेळाडूंनी देशाला पहिल्यांदाच रौप्यपदक मिळवून दिले आहे. या स्पर्धेत देवदत्तचे विद्यार्थी किशोर शिंदे याने मास्टर वन कॅटेगरीमध्ये 82.5 किलो वजन गटात सुवर्णपदक व अमोल गायकवाड याने 100 किलो वजन गटात रौप्यपदक पटकावलंय.
दरम्यान, या तिघांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राप्त केलेल्या या यशाबद्दल बुधवारी (ता. 12) अहिल्यानगर शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने दिल्लीगेट भागातून त्यांची वाजत गाजत, फटाक्यांची अतिषबाजी करून व गुलालाची उधळण करत बग्गीतून मिरवणूक काढून विजयाचा सोहळा साजरा केला. तर भिंगार शहरातही त्यांचा सत्कार करण्यात आलायं.
