Russia-Ukraine War : रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचा हॅरि पॉटर कॅसल आगीच्या भक्ष्यस्थानी; 4 जणांचा मृत्यू

Russia-Ukraine War : रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचा हॅरि पॉटर कॅसल आगीच्या भक्ष्यस्थानी; 4 जणांचा मृत्यू

Russia-Ukraine War Harry Potter Cassel fire in attack : जगात एकीकडे इस्त्राइल आणि हमास युद्ध सुरू आहे. तर दुसरीकडे रशिया आणि युक्रेन ( Russia-Ukraine War ) यांच्यात देखील अद्यापही युद्धविराम झालेला नाही. नुकताच रशियाने युक्रेनवर हल्ला ( attack ) केला. त्यामध्ये युक्रेनची हॅरि पॉटर कॅसल ( Harry Potter Cassel ) ही या इमारतीला भीषण आग लागली. तसेच चार जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे.

उद्धव ठाकरेंना नैराश्य, राऊतांनी जिल्हा परिषदेत तरी…; शंभूराज देसाईंचे टीकास्त्र

रशियाकडून युक्रेनमधील हॅरी पॉटर कॅसल या नावाच्या एका सुंदर महालाप्रमाणे असणाऱ्या इमारतीवर रशियन मिसाईलद्वारे हल्ला करण्यात आला आहे. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, यामध्ये जवळपास 20 अनिवासी इमारती आणि पायाभूत सुविधा त्यांना नुकसान पोहोचलं आहे.

जीएसटी संकलनाने सरकारची तिजोरी फुगली! एप्रिल महिन्यात केला विक्रम; वाचा सविस्तर

याबाबत चे फोटो आणि व्हिडिओ युक्रेनकडून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. ज्यामध्ये एक शैक्षणिक संस्थेची शंकू आकाराची इमारत इमारतीचं छत आगीच्या भक्षस्थानी सापडलं आहे. तर स्कॉटिश बॅरोनियल प्रमाणे दिसत असल्याने या इमारतीला हॅरी पॉटर कॅसल या नावाने ओळखलं जातं. तर रशियाच्या या हल्ल्यामध्ये बॅलेस्टिक मिसाईल आणि क्लस्टर हत्यारांचा वापर करण्यात आल्याचा आरोप युक्रेनने केला आहे.

तसेच या हल्ल्यामध्ये चार लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू असून युक्रेनमधील शांत शहरांवर हल्ले करणाऱ्यांचा आम्ही शोध घेऊ तसेच त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई देखील करू असेही युक्रेनच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube