उद्धव ठाकरेंना नैराश्य, राऊतांनी जिल्हा परिषदेत तरी…; शंभूराज देसाईंचे टीकास्त्र
Shambhuraj Desai On Sanjay Raut : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) रणधुमाळीत सध्या राज्यात आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील टीकेच्या फैरींमुळे राजकीय वातावरण चांगलचं तापलं. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज शिंदे गटावर जोरदार टीका केली. शिदे गटाने भाजपसमोर लोटांगण घातल्याची टीका त्यांनी केला. त्या टीकेला आता उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी केली.
जीएसटी संकलनाने सरकारची तिजोरी फुगली! एप्रिल महिन्यात केला विक्रम; वाचा सविस्तर
शंभूराज देसाई यांनी आज कराड येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत तेरा खासदार आहेत. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रभर दौरा सुरू केला आहे. कधी नव्हे ते एवढं फिरत आहे. त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. लोक त्यांच्यासोबत येत नाहीत. लोकांनी त्यांचे विचार स्वीकारले नाहीत, त्यामुळं त्यांच्यात नैराश्य आहे, असं देसाई म्हणाले.
मोदींविरोधात निवडणूक लढवणार ‘हा’ कॉमेडियन! म्हणाला, राजकारणात कॉमेडी म्हणून मी …
पुढं बोलतांना ते म्हणाले, शिवसैनिक एकत्र होते, त्यावेळी मिळालेला प्रतिसाद आणि सध्या मिळणारा प्रतिसाद यात तफावत आहे. संजय राऊत यांच्यासारखे काही विश्वज्ञानी लोक त्यांच्यासोबत आहेत. ते दहा ते पंधरा लाख मतदारांनी निवडून दिलेल्या खासदारांवर टीका करतात. राऊतांनी जिल्हा परिषदेत तरी निवडणून येऊन दाखवावं, स्वतः कधी निवडून यायचे नाही, लोकांमध्ये जायचं नाही आणि जे 10-15 लाख लोकांमधून निवडून येतात, त्यांच्यावर टीका करायची हा त्यांचा उद्योग सुरू आहे, असंही शंभूराज देसाई म्हणाले.
संजय राऊत यांनी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर बोलतांना औरंगजेबाच्या स्वाऱ्या महाराष्ट्रावर सुरू आहेत, अशी टीका केली होती. त्याविषयी विचारले असता राऊत म्हणाले की, माध्यमांनी संजय राऊत यांना महत्त्व देण्याचे कारण नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला मोठ्या उंचीवर नेले आहे. देशातील जनता त्यांना स्वीकारते. ज्या नेतृत्वाला देशाने डोक्यावर घेतले, ते एका बाजूला आहेत आणि संजय राऊत सारखी माणसं एका बाजूला आहे. त्यांना निवडणुकीच्या मतदानातूनच उत्तर मिळेल, असंही राऊत म्हणाले.