मोदींविरोधात निवडणूक लढवणार ‘हा’ कॉमेडियन! म्हणाला, राजकारणात कॉमेडी म्हणून मी …

मोदींविरोधात निवडणूक लढवणार ‘हा’ कॉमेडियन! म्हणाला, राजकारणात कॉमेडी म्हणून मी …

Lok Sabha Election 2024: सोशल मीडियावर (Social Media) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची मिमिक्री करून चर्चेत आलेला कॉमेडियन श्याम रंगीलाने (Shyam Rangeela) आता एक मोठी घोषणा केली आहे. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून (Varanasi Lok Sabha  2024) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याची घोषणा त्याने एक्स अकाऊंटवरुन केली आहे.

राजकारणाचा कॉमेडी क्षेत्रात शिरकाव झाल्याने मी मीही आता राजकारणात एंट्री करणार असल्याचे त्याने म्हटलं आहे. तसेच कॉमेडीत आपणाला हवे तसे काम करता येत नसल्याचा आरोप देखील त्याने यावेळी केला.

आपल्या देशात लोकशाही धोक्यात नाही हे दाखवण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. वाराणसी लोकसभा मतदारसंघात लोकांना माझ्या रुपाने मतदानासाठी एक नवीन पर्याय उपलब्ध होणार तसेच या मतदारसंघात सूरत किंवा इंदूरसारखी स्थिती निर्माण होऊ नये यासाठी मी ही निवडणूक लढवणार आहे. असं त्याने म्हटलं आहे.

रंगीला याने 2022 मध्ये पहिल्यांदा राजकारणात प्रवेश करून आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला होता मात्र राजस्थानमध्ये पक्ष फ्लॉप ठरला. यामुळे त्याने आता निवडणूक लढवण्यासाठी वाराणसीची निवड केली आहे.

भारताला धक्का देत इंग्लंडच्या माजी कर्णधाराने T20 World Cup 2024 च्या उपांत्य फेरीसाठी निवडले ‘हे’ संघ

यामुळे आता वाराणसी लोकसभा मतदारसंघात नरेंद्र मोदी विरुद्ध श्याम रंगीला अशी लढत होणार आहे. सोशल मीडियावर नरेंद्र मोदी यांची मिमिक्री करत असल्याने त्याला एक वेगळी ओळख मिळाली आहे.

‘हे सर्व उमेदवार तुम्हाला किरीट सोमय्यांमुळे मिळाले’, भ्रष्टाचारांच्या आरोपावरून महायुतीवर अनिल परबांचा घणाघात

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज