पुणेकरांचा मेट्रो प्रवास उद्यापासून सुरू; फडणवीस म्हणाले, मोदींनी भूमिपूजन केलेल्या मेट्रोचे त्यांच्याच हस्ते लोकार्पण
Fadanvis on Hinjewadi Shivajinagar Metro 3 Pune; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज या मेट्रो मार्गाचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले.
Fadanvis on Hinjewadi Shivajinagar Metro 3 Pune : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान धावणाऱ्या मेट्रो 3 मार्गिकेचे (पिंक लाईन) आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते दुपारी 12:30 वाजता ऑनलाइन उद्घाटन पार पडले. उद्यापासून म्हणजेच 4 नोव्हेंबरपासून ही मेट्रो सेवा प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. सकाळी 6 वाजल्यापासून प्रवाशांना मेट्रोने प्रवास करता येणार आहे. त्यामुळे हिंजवडी आयटी पार्क आणि शिवाजीनगरदरम्यान रोज प्रवास करणाऱ्या नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
भाजपच्या ‘मोठ्या भाऊ’गिरीला देसाईंचा ठसका! साताऱ्यात विजयी होत दिला राजकीय इशारा
मोदींनी भूमिपूजन केलेल्या मेट्रोचे त्यांच्याच हस्ते लोकार्पण
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते, त्याच प्रकल्पाचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते होत आहे. मोदींनी भूमिपूजन केलेल्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटनही त्यांच्याच हस्ते झाले असून, आजचा कार्यक्रमही त्याच मालिकेतील आहे. महाराष्ट्रात मेट्रोच्या विकासाला मोदींच्या नेतृत्वात सुरुवात झाली, असेही त्यांनी नमूद केले.
23.2 किलोमीटरचा मेट्रो मार्ग, 23 स्थानके
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाची एकूण लांबी 23.2 किलोमीटर आहे. या मार्गावर एकूण 23 स्थानके आहेत. मात्र, सुरुवातीच्या टप्प्यात 17 स्थानकांवरच प्रवासी सेवा सुरू केली जाणार आहे. उर्वरित 6 स्थानके टप्प्याटप्प्याने प्रवाशांसाठी खुली केली जातील. त्यामुळे पुणे शहर आणि आयटी हब असलेल्या हिंजवडीदरम्यान सार्वजनिक वाहतुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे.
टाटा प्रोजेक्ट्स आणि सिमेन्सचे फडणवीसांकडून कौतुक
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे काम टाटा प्रोजेक्ट्स आणि सिमेन्स यांनी मिळून पूर्ण केले आहे. हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक होता. मात्र, या दोन्ही कंपन्यांनी कठीण परिस्थितीतही काम पूर्ण केले. त्याबद्दल फडणवीस यांनी संबंधित कंपन्यांचे अभिनंदन केले.
आयटी कर्मचाऱ्यांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार
हिंजवडी ते शिवाजीनगर हा परिसर देशातील महत्त्वाचे आयटी केंद्र म्हणून ओळखला जातो. देशाच्या आयटी क्षेत्रात या भागाचे मोठे योगदान आहे. दररोज हजारो कर्मचारी आणि नागरिक या परिसरात ये-जा करतात. मात्र, वाहतूक कोंडीमुळे त्यांना मोठा वेळ रस्त्यावर घालवावा लागत होता. मेट्रो सुरू झाल्यानंतर या प्रवाशांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळण्यास मदत होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
पुण्यात FDA ची मिठाई विक्रेत्यांवर मोठी कारवाई; 1188 किलो लाडू-बुंदी, तर 303 किलो बर्फीचा साठा नष्ट
मेट्रो विकासाचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात मेट्रो मार्गांचा विस्तार झाला आहे. या विकासाचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला मिळाला असल्याचे फडणवीस म्हणाले. मेट्रोमुळे केवळ प्रवासाची सुविधा वाढणार नाही, तर परिसरात रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होतील, असेही त्यांनी सांगितले.