‘हे सर्व उमेदवार तुम्हाला किरीट सोमय्यांमुळे मिळाले’, भ्रष्टाचारांच्या आरोपावरून महायुतीवर अनिल परबांचा घणाघात
Anil Parab On Kirit Somaiya : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये (Mahayuti) जागा वाटपाचा फॉर्म्युला सुटला असून शिवसेना शिंदे गटाकडून दक्षिण मुंबई लोकसभेसाठी आमदार यामिनी जाधव (Yamini Jadhav) तर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेसाठी रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
शिंदे गटाकडून नावांची घोषणा होताच महाविकास आघाडीकडून भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर चारही बाजूने टीका होताना दिसत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आमदार यामिनी जाधव आणि रवींद्र वायकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते यामुळे हा भ्रष्टाचार भाजपला मान्य आहे का ? असा सवाल ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषदेमध्ये विचारला.
अनिल परब म्हणाले, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगतिले आहे की, पक्षाच्या सांगण्यावरून मी हे केले आहे. यामुळे हा भ्रष्टाचार भाजपला मान्य आहे का ? याबाबत भाजपने खुलासा करावा असं देखील अनिल परब म्हणाले.
हे सर्व उमेदवार तुम्हाला किरीट सोमय्यांमुळे मिळाले
हे सर्व उमेदवार तुम्हाला किरीट सोमय्या यांच्यामुळे मिळाले आहे यामुळे तुम्ही किरीट सोमय्या यांची या उमेदवारांच्या प्रचारप्रमुख पदी नियुक्ती करावी ते लोकांना सांगतील हे उमेदवार स्वच्छ आणि योग्य कसे आहे? अशी मागणी अनिल परब यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.
मोदींकडून पवारांचा ‘भटकती आत्मा’ उल्लेख, महायुतीला पडणार महागात?, अजित पवारांकडून डॅमेज कंट्रोल
कोणती शिवसेना खरी आहे हे संपूर्ण जगाला माहिती आहे असं उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रवींद्र वायकर म्हणाले होते. यावर बोलताना अनिल परब म्हणाले की, या लोकसभा निवडणुकीत तुम्हाला कळेल खरी शिवसेना कोणती आहे? रवींद्र वायकर यांनी निवडणूक लढवावी त्यांना आम्ही दाखवणार खरी शिवसेना कोणती आहे. असा इशारा अनिल परब यांनी या पत्रकार परिषदेमध्ये रवींद्र वायकर यांना दिला. यामुळे या लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.