भ्रष्टाचाराचं आरोप अन् घरावर आयटी रेड कोण आहेत अरविंद सावंतांना फाईट देणाऱ्या यामिनी जाधव?

भ्रष्टाचाराचं आरोप अन् घरावर आयटी रेड कोण आहेत अरविंद सावंतांना फाईट देणाऱ्या यामिनी जाधव?

Who is Yamini Jadhav : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने (Shiv Sena) मोठी घोषणा करत दक्षिण मुंबईमधून यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघात आता यामिनी जाधव विरुद्ध अरविंद सावंत (Arvind Sawant) अशी लढत होणार आहे. यामुळे या मतदारसंघात आता कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

यामिनी जाधव यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत भायखळा विधानसभा मतदारसंघातून एमआयएमचे (AIMIM) नेते वारीस पठाण (Waris Pathan) यांचा पराभव करत विधानसभेत प्रवेश मिळवला होता. मात्र त्यानंतर मोठा निर्णय घेत यामिनी जाधव एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्या होत्या. ठाकरे कुटुंबाशी अत्यंत घनिष्ठ संबंध असल्याने त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले होते.

कोण आहेत यामिनी जाधव?

यामिनी जाधव उच्च शिक्षित असून गेल्या अनेक वर्षांपासून ते शिवसेनेत सक्रिय आहेत. 2012 मध्ये त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनी महापालिकेत नगरसेविका म्हणून विविध समित्यांवर काम केले आहे. यामुळे यामिनी जाधव यांच्या नाव महापौरपदासाठीही चर्चेत आले होते. तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वारीस पठाण यांचा पराभव करून विधानसभेत प्रवेश मिळवला.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधववर 15 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केले होते. यानंतर यशवंत जाधव यांच्या घरी आयटीने रेड मारली होती.

… म्हणून उद्धव ठाकरे शिवराळ भाषेत बोलत आहे, फडणवीसांचा घणाघात

किरीट सोमय्या यांनी काय आरोप केले होते

किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी यशवंत जाधव यांच्या खात्यात 2 कोटींचं व्यवहार झाले असून यामिनी जाधव यांच्या खात्यात प्रत्येकी एक कोटींचे व्यवहार झाले असल्याचे आरोप त्यांनी केले होते. याच बरोबर मुलगा यतिन जाधव यांची कंपनी शौरुप ट्रेडिंग प्रा. लिमिटेडच्या खात्यातून 3 कोटींचा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज