वंचितने अफसर खान यांना एबी फॉर्म नाकारला, प्रकाश आंबेडकर एमआयएमला पाठिंबा देणार?

वंचितने अफसर खान यांना एबी फॉर्म नाकारला, प्रकाश आंबेडकर एमआयएमला पाठिंबा देणार?

VBA denied AB form to Afsar Khan :  महाविकास आघाडीशी (Mahavikas Aghadi) चर्चा फिस्टकटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) अनेक जागांवर आपले उमेदवार जाहीर केले होते. मात्र, आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्या शेवटची तारीख असतांना वंचितने छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी (Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha) जाहीर केलेले उमेदवार अफसर खान ( Afsar Khan) यांना एबी फॉर्म नाकारलाय. यामुळे अफसर खान उद्या अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Manoj Jarange : मोठी बातमी! मनोज जरांगेंची तब्येत बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल 

काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक अफसर खान यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केली होती. त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर महाविकास आघाडी, महायुतीच्या उमेदवारांनी तसेच काही अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. माात्र, अफसर खान यांना वंचितने एबी फॉर्म नाकारून मोठा धक्का दिला आहे.

निलेश लंकेंवर संपत्तीएवढाच कर्जाचा डोंगर; 44 लाख संपत्ती अन् 37 लाखांचं कर्जच! 

याआधी उमेदवारांची यादी जाहीर होताच वंचितने रामटेक, वाशिम- यवतमाळ, परभणी, दिंडोरी येथे पक्षाने उमेदवार बदलले, त्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना वंचितने खान यांना एबी फॉर्म नाकारल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, अफसर खान आता अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. उद्या ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे वृत्त आहे.

मला एबी फॉर्म का मिळाला नाही? कोणाच्या सांगण्यावरून तो राखण्यात आला हे मी २६ किंवा २७ तारखेला पत्रकार परिषदे घेऊन जाहीर करेन, अशी धमकी वजा इशारा खान दिला. माझ्यासोबत राहिलेल्या वंचित, वंजारी, ओबीसी समाज बांधवांनी मला पाठिंबा कायम ठेवावा, असं आवाहन खास यांनी केलं.

काही दिवसांपूर्वी एमआयएमने अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा जाहीर केला होता. तर एमआयएमचे उमेदवार खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधी उमेदवारास एबी फॉर्म नाकारला. यामुळे वंचित आता दुसरा उमेदवार देणार की एमआयएमच्या उमेदवाराला पाठिंबा देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोण आहे अफसर खान?

छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे मजबूत संघटन आहे. या संघटनेच्या जोरावर 2019 मध्ये एमआयएम आणि वंचित आघाडीचे इम्तियाज जलील यांनी ही जागा जिंकली होती. यामध्ये वंचित बहुजन आघाडी या कॅडर बेस पार्टीचा मोठा वाटा होता. पक्षाची ही ताकद लक्षात घेऊन अफसर खान यांनी वंचितमध्ये प्रवेश केला होता. मात्र 22 दिवसांतच त्यांनी वंचितांपासून स्वत:ला वेगळे केले आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज