ठरलं..! उत्कर्षा रुपवते आज भरणार उमेदवारी अर्ज; वंचित आघाडीची शिर्डीत एन्ट्री

ठरलं..! उत्कर्षा रुपवते आज भरणार उमेदवारी अर्ज; वंचित आघाडीची शिर्डीत एन्ट्री

Shirdi Lok Sabha Election : शिर्डी लोकसभा निवडणुकीत आज वंचित बहुजन आघाडीच्या एन्ट्रीने येथील निवडणूक आता तिरंगी झाली आहे. वंचित आघाडीने उत्कर्षा रुपवते यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतर आज उत्कर्षा रुपवते सकाळी राहता येथे निवडणूक कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उत्कर्षा रुपवते यांनी मागील आठवड्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली होती. यानंतर त्यांनी आघाडीत प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर लगेचच त्यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.

 Shirdi Loksabha : स्वपक्षातील नाराजी वाढली! शिर्डीतील दोन्ही उमेदवारांच्या अडचणीत भर

उत्कर्षा रुपवते महाविकास आघाडीकडून निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या. पण, जागावाटपात हा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाट्याला गेला. ठाकरे गटाने येथे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे उत्कर्षा रुपवते नाराज झाल्या होत्या. या नाराजीतूनच त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. पुढं काय करायचं असा प्रश्न होता. नंतर त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या रुपाने पर्याय मिळाला.

मागील आठवड्यात रुपवतेंनी वंचित आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. वंचित आघाडीत जाहीर प्रवेश केला. यानंतर लगेचच आघाडीने त्यांना उमेदवारीही जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रुपवतेंनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आज सकाळी दहा वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी मोठ्या शक्तीप्रदर्शनाची तयारी रुपवतेंनी केली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी जाताना भव्य रॅली काढण्यात येणार आहे. याद्वारे शक्तीप्रदर्शनाचे नियोजन वंचित बहुजन आघाडीने केले आहे. या रॅलीत आघाडीचे स्थानिक आणि राज्य पातळीवरील नेते सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.

शिर्डी लोकसभेची लढाई धनशक्ती विरुध्द जनशक्ती; उत्कर्षा रूपवतेंचा आजी-माजींवर हल्लाबोल

काँग्रेसने माझा गांभीर्याने विचार केला नाही

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी आपली भूमिका मांडली.‌ त्या पुढे म्हणाल्या, तीन पिढ्यापासून आम्ही काँग्रेससोबत होतो. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आपण काँग्रेस पक्षाकडून इच्छुक होतो. मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी आपल्या उमेदवारीबाबत गांभीर्याने विचार केला नाही. या मतदार संघात माझ्यासाठी शेवटची संधी होती. त्यामुळे आपण बहुजन वंचित आघाडी कडून निवडणूक लढविण्याचे पाऊल उचलले.

आमदार बाळासाहेब थोरात हे जेष्ठ नेते आहेत. माझ्यासाठी ते आदरणीय आहेत. काहीही झाले तरी मी अहमदनगर जिल्ह्याची मुलगी आहे. जिल्ह्यातील मी सगळ्या नेत्यांना भेटून माझी भूमिका मांडणार आहे. त्यांना मला मदत करणे शक्य आहे, त्यामुळे मी माझी भूमिका मांडणार असल्याचे उत्कर्षा रुपवते म्हणाल्या होत्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज