Shirdi Loksabha 2024 : वाकचौरेंना उमेदवारी पण महाविकास आघाडीत नाराजी, रुपवते बंडाच्या तयारीत

Shirdi Loksabha 2024 : वाकचौरेंना उमेदवारी पण महाविकास आघाडीत नाराजी, रुपवते बंडाच्या तयारीत

Shirdi Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष (Political Party)आपल्या उमेदवार जोरदार तायरी सुरु आहे. त्यातच आता ठाकरे गटाकडून लोकसभेच्या 17 उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली. यामध्ये ठाकरे गटातून शिर्डीसाठी भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure)यांची उमेदवारी फायनल झाली आहे. वाकचौरे यांच्या उमेदवारीवरुन आता महाविकास आघाडीमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. शिर्डीमधून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या काँग्रेसच्या उत्कर्षा रुपवते (Utkarsha Rupwate )या आता बंडाच्या तयारीत असल्याचे दिसते. रुपवते यांनी आपल्या सोशल मीडिया हॅन्डलवरुन काँग्रेसचे चिन्ह व महाविकास आघाडीच्या नेत्यांचे बॅनर हटवले आहे. त्यामुळे रुपवते या नाराज असल्याची चर्चा देखील आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सुखी संसारासाठी तावून सुलाखून जाणाऱ्या जोडप्याची कथा; ‘सुख कळले’ रसिकांच्या भेटीला

लोकसभा निवडणुकीचे बिगल वाजले असून आता हळूहळू राजकीय पक्षांकडून आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या शिर्डीमधून कोण उमेदवार असणार? याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगली होती. लोकसभेपूर्वी भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला होता. यामुळे वाकचौरे यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा देखील होती.

नाशिक, सातारा काय ठरलं? अजितदादा म्हणतात, उद्या सगळंच क्लिअर होईल

मात्र वाघचौरे यांच्या उमेदवारीवरुन महाविकास आघाडीमध्ये नाराजी देखील पाहायला मिळाली. वाकचौरे यांच्या उमेदवारीला पक्षातूनच विरोध होऊ लागला होता. वाकचौरे यांच्या विरोधात असलेली नाराजी पाहता काँग्रेसला ही जागा सोडण्यात यावी अशी मागणी उत्कर्षा रुपवते यांनी केली होती.

शिर्डीची जागा काँग्रेसला मिळाल्यास रुपवते या लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत देखील होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून रुपवते यांनी मतदारसंघांमध्ये भेटीगाठी देखील वाढवल्या होत्या. तसेच जनसंपर्क देखील वाढवला होता. विशेष म्हणजे मोठा राजकीय वारसा असलेल्या रुपवते यांनाच तिकीट मिळेल, अशी शक्यता देखील वर्तवली जात होती. त्यातच आज यादी जाहीर झाली आणि वाकचौरे यांना उमेदवारी मिळाल्याने त्या नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली.

रुपवते बंडाच्या तयारीत
शिर्डी लोकसभेसाठी काँग्रेसकडून रुपवते या उमेदवारीसाठी इच्छुक होत्या. मात्र ठाकरे गटाकडून वाकचौरे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने आता त्या बंडाच्या तयारीत असल्याचे दिसते. रुपवते यांनी आपल्या सोशल मीडिया हॅन्डलवरुन काँग्रेसचे पोस्टर तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो देखील हटवले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात रुपवते नेमका काय निर्णय घेणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube