Prakash Ambedkar : राऊतांवर निशाणा पण मविआसोबत चर्चा बंद नाही; आंबेडकरांच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला
Prakash Ambedkar : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरलेल्या प्रकाश आंबेडकरांच्या ( Prakash Ambedkar ) वंचित बहुजन आघाडीने यंदाच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. यादरम्यान आज झालेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी भाष्य केले. ते म्हटले की, सध्या त्यांची विविध संघटनांशी चर्चा सुरू आहे. दोन एप्रिलपर्यंत ते भाजपविरोधी आपली आघाडी तयार करणार आहेत. त्यामधील मनोज जरांगे त्यांच्याशी चर्चा झाली असल्याची माहिती आंबेडकरांनी दिली.
Nora Fatehi : डान्सर नोरा फतेहीच्या स्टाईलीश अंदाजने वेधले चाहत्यांचं लक्ष
मात्र आणखी कोणत्या संघटने प्रकाश आंबेडकरांसोबत आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच ते यावेळी महाविकास आघाडी सोबतही चर्चा बंद झाली नसल्याचे म्हटले त्यामुळे सस्पेन्स आणखी वाढला आहे. दरम्यान 2019 ला वंचित आणि ओवेसी यांच्या एमआयएमसोबत युती केली होती. त्याचा आघाडीला 12 ते 15 मतदारसंघांमध्ये फटका बसला होता. तर, त्याचा थेट फायदा भाजप-शिवसेना युतीला झाला होता.
सोनू सूदने ‘या’ कारणासाठी हार्दिक पांड्याला केला सपोर्ट; म्हणाला, ‘आम्ही आमच्या खेळाडूंचा …’
यावेळी आंबेडकरांनी संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले कालचं वक्तव्य संजय राऊत यांचं होतं. संजय राऊत आणि महाविकास आघाडी वेगवेगळ्या आहेत. तर संजय राऊतांमुळेच आघाडीमध्ये बिघाडी निर्माण होत असल्याचेही आंबेडकरांनी म्हटलं. त्यामुळे आम्ही कोणतेही दरवाजे बंद केलेले नाहीत. संजय राऊत हेच सर्व बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला.
काय म्हणाले होते संजय राऊत?
प्रकाश आंबेडकर जे बोलत आहेत त्याच्याशी माझा काहीच संबंध नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केली होती. आम्ही त्यांना पाच जागांचा प्रस्ताव दिला आहे. आता त्यावर प्रकाश आंबेडकरांनी निर्णय घ्यावा. तसेच आंबेडकर कालपर्यंत नाना पटोलेंवर आरोप करत होते. आता माझ्याबद्दल बोलतायत, त्यांना आता मी काय बोलणार… परंतु, मला विश्वास आहे की, प्रकाश आंबेडकर संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या बाजूने जाणार नाहीत. त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत करणार नाहीत. आमची लढाई ही संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या विरोधात आहे.
त्यावर आंबेडकर म्हणाले की, संजय राऊत, तुम्ही किती खोटं बोलणार? तुम्ही म्हणताय की, तुमचे आणि आमचे विचार एकसारखे आहेत तर, मग तुमच्या बैठकांमध्ये आम्हाला का बोलवत नाही? एका बाजूला आघाडी बनवत असल्याचं चित्र निर्माण करताय आणि दुसऱ्या बाजूला आम्हालाच पाडण्याचा कट रचताय. तुम्ही तर मित्राच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं आहे.