सोनू सूदने ‘या’ कारणासाठी हार्दिक पांड्याला केला सपोर्ट; म्हणाला, ‘आम्ही आमच्या खेळाडूंचा …’

सोनू सूदने ‘या’ कारणासाठी हार्दिक पांड्याला केला सपोर्ट; म्हणाला, ‘आम्ही आमच्या खेळाडूंचा …’

Sonu Sood : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सोनू सूदला (Sonu Sood) केवळ मोठ्या पडद्यावरचा नाही तर खऱ्या आयुष्यातील हिरो देखील मानला जातो. कोरोनाच्या काळात सोनू सूद लाखो लोकांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे आला होता. सोनू सूदने हाती घेतलेला हा वसा आजही अविरत सुरु ठेवला आहे. केवळ कोरोनाच्या काळातच नाही, तर आजही तो लाखो गरीबांना मदत करतो. आजही त्याच्या घराबाहेर मदतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लोकांना रांग लागलेली असते. केवळ गरजू लोकच नाही तर, अभिनेत्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी देखील मदत करण्याचा वसा हाती घेतला आहे. आता अभिनेत्याने हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) सोशल मीडियावरून (social media) सपोर्ट करताना दिसत आहे.

सध्या आयपएलची चर्चा असताना हार्दिक खूप मोठ्या प्रमाणावर ट्रोल होताना दिसतोय अश्यातच हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने एकापाठोपाठ एक सामने गमावले आणि ज्यामुळे त्याला अहमदाबाद तसेच हैदराबादमधील प्रेक्षकांनी ट्रोल केलं, त्यावर प्रतिक्रिया देताना सूदने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर खास पोस्ट लिहून अष्टपैलू क्रिकेटरसाठी पाठिंबा दर्शविला आहे.

सोनू सूदने ट्विट करत म्हणाला की, आपण आपल्या खेळाडूंचा आदर केला पाहिजे. ज्या खेळाडू मुळे आपल्याला अभिमान वाटला पाहिजे त्या खेळाडूंनी आमच्या देशाचा गौरव केला पाहिजे. एके दिवशी तुम्ही त्यांचा जयजयकार कराल, दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्याल. ते नाही तर आपणच अयशस्वी होतो. मला क्रिकेट आवडते. माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणारा प्रत्येक क्रिकेटपटू मला आवडतो. तो कोणत्या फ्रेंचायझीसाठी खेळतो हे महत्त्वाचे नाही. तो कर्णधार म्हणून खेळतो किंवा तो संघातील 15 वा खेळाडू आहे याने काही फरक पडत नाही. ते आमचे हिरो आहेत 🇮🇳”

कालिन भैया आणि गुड्डू पंडित या महिन्यात माजवणार खळबळ? निर्मात्याने दिली रिलीजबाबत हिंट

यापूर्वी अभिनेता आंदोलक शेतकरी, विमान कर्मचारी आणि इतर अनेकांच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असलेल्या समस्या मांडण्यामागे त्यांचा आवाज आहे.दरम्यान, वर्क फ्रंटवर, सोनू सूद त्याच्या आगामी सायबर क्राइम थ्रिलर ‘फतेह’ च्या रिलीजसाठी तयारी करत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज