निलेश लंकेंवर संपत्तीएवढाच कर्जाचा डोंगर; 44 लाख संपत्ती अन् 37 लाखांचं कर्जच!
Nilesh Lanke Property : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या (Ahmednagar Loksabha) लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) तर महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निलेश लंकेंना तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे निलेश लंके विरुद्ध सुजय विखे असा सामना पाहायला मिळणार आहेत. दोन्ही उमेदवारांकडून आपापले अर्ज दाखल करण्यात आले आहेत. निलेश लंके यांनी उमेदवारी अर्जासोबत आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. लोकसेवेचा विडा उचललेले अशी ओळख असलेले निलेश लंके यांची नेमकी संपत्ती किती आहे हे पाहुयात…
निलेश लंके यांच्याकडे एकूण संपत्ती 44 लाख 32 हजार रुपये एवढी संपत्ती दाखवण्यात आली आहे. तर या संपत्तीपैकी त्यांच्यावर एकूण 37 लाख 48 हजार रुपयांचे कर्ज असल्याची माहिती लंके यांनी उमेदवारी अर्जात दिली आहे. निलेश लंके नेहमीच समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तीला कधीही संपत्तीचा मोह नसतो, मी लोकप्रतिनिधी आहे आणि लोकप्रतिनिधींनी जनतेची सेवा केली पाहिजे हाच उद्देश ठेवून मी काम करतो असल्याचं सांगत असतात. आजही उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी सेम हीच लाईन रिपीट केली आहे.
इंडियन पोस्ट खात्यात ‘या’ पदांसाठी भरती सुरू, महिन्याला मिळणार 63 हजार रुपये पगार
निलेश लंके यांनी आपल्या संपत्तीच विवरण उमेदवार अर्जात दिले आहे. निलेश लंके यांच्याकडे एकूण रोख रक्कम 81 हजार 400 रुपये असून स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये एकूण 7 लाख 76 हजार 896 रुपयांची ठेव आहे. तर साई मल्टिस्टेट को ऑप सोसामध्ये 120 रुपयांचे शेअर्स आणी सेनापती बापट मल्टी सोसा. 12 हजार 510 रुपये, नगर अर्बन बॅंक 8 हजार 400 रुपयांचे शेअर्सं आहेत.
उमेदवार की मल्टिनॅशनल कंपनी, 5785 कोटींची मालमत्तासह ‘हे’ ठरले आतापर्यंतचे सर्वात श्रीमंत उमेदवार
तसेच निलेश लंके यांनी 2021 साली ह्युंदाई क्रेटा वाहन विकत घेतलं आहे. या वाहनाची किंमत 13 लाख ५ हजार 8 रुपये आहे. तर लंके यांच्याकडे एकूण 20 ग्रॅम सोनं असून त्याची किंमत 1 लाख 47 हजार 400 रुपये असल्याचं अर्जात नमूद करण्यात आलं आहे. यासोबतच पत्नी राणी निलेश लंके यांच्याकडे एकूण रोख रक्कम 40 हजार 200 रुपये तर बॅंक ऑफ बडोदामध्ये 3 लाख 1 हजार 834 रुपयांची ठेव आहे. तसेच 30 ग्रॅम सोन असून त्याची किंमत 2 लाख 6 हजार 250 इतकी आहे.