उमेदवार की मल्टिनॅशनल कंपनी, 5785 कोटींची मालमत्तासह ‘हे’ ठरले आतापर्यंतचे सर्वात श्रीमंत उमेदवार

उमेदवार की मल्टिनॅशनल कंपनी, 5785 कोटींची मालमत्तासह ‘हे’ ठरले आतापर्यंतचे सर्वात श्रीमंत उमेदवार

Lok Sabha Election 2024 Richest Candidate:  देशात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. आतापर्यंत देशातील 102 मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. तर आता पुढील टप्प्यासाठी  निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

पुढील टप्प्यासाठी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. आता समोर आलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील गुंटूर लोकसभा मतदारसंघातून (Guntur Lok Sabha Constituency) तेलुगू देसम पक्षाचे (TDP) डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी (Dr. Chandra Shekhar Pemmasani) आतापर्यंतचे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. अर्ज दाखल करताना त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे तब्बल  5,785.28 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

प्रतिज्ञापत्रानुसार, चंद्रशेखर पेम्मासानी व्यवसायाने डॉक्टर असून त्यांनी अनेक कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यांची बहुतांश मालमत्ता अमेरिकेत आहे. त्यांनी  US कर अधिकाऱ्यांना FY21 आणि FY20 साठी अनुक्रमे 643 कोटी आणि 594 कोटी रुपयांचे उत्पन्न जाहीर केले आहे. चंद्रशेखर पेम्मासानी यांच्याकडे त्यांची वैयक्तिक मालमत्ता 2,448.72 कोटी रुपये असून त्यांच्या  पत्नी श्रीरथना कोनेरू यांच्याकडे 2,343.78 कोटी रुपयांची मालमत्ता आणि मुलांकडे 1,000 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. याच बरोबर त्यांनी अनेक यूएस-आधारित कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असून त्यांच्याकडे त्या कंपन्यांचे शेअर्स आहे. तर त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने अमेरिकन बँकेकडून 1,038 कोटी रुपये क्रेडिट म्हणून घेतले आहेत.

देवेंद्र फडणवीसांना धक्का, फलटणमध्ये बदलली राजकीय समीकरणे, मोहिते पाटलांसाठी निंबाळकर कुटुंबीयांचा मोठा निर्णय

चंद्रशेखर पेम्मासानी यांच्याकडे अमेरिकेत रोल्स रॉयस घोस्ट, मर्सिडीज बेंझ आणि टेस्ला सारख्या कार आहेत. माहितीनुसार, 2014 पासून गुंटूरमधून डॉ. पेम्मासानी तिकीट मागत होते. या लोकसभा निवडणुकीत त्यांचा सामना वायएसआर काँग्रेस पक्षाचे के वेंकट रोसैया यांच्याशी होणार आहे.  चंद्रशेखर पेम्मासानी यांनी उस्मानिया विद्यापीठातून एमबीबीएस केले आणि त्यानंतर ते पदव्युत्तर पदवीसाठी यूएसला गेले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज