देवेंद्र फडणवीसांना धक्का, फलटणमध्ये बदलली राजकीय समीकरणे, मोहिते पाटलांसाठी निंबाळकर कुटुंबीयांचा मोठा निर्णय

देवेंद्र फडणवीसांना धक्का, फलटणमध्ये बदलली राजकीय समीकरणे, मोहिते पाटलांसाठी निंबाळकर कुटुंबीयांचा मोठा निर्णय

Madha Lok Sabha Election 2024 :  गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात माढा लोकसभा मतदारसंघ (Madha Lok Sabha Constituency) चर्चेत आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) माढा लोकसभा मतदारसंघात रणजीतसिंह नाईक निंबाळकर (Ranjeetsingh Naik Nimbalkar) यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर शरद पवार गट आणि भाजपमध्ये वार-पलटवार पाहायला मिळत आहेत. भाजपकडून रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी भाजपला धक्का देत शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश केला होता. यानंतर शरद पवार यांच्याकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे माढा लोकसभा मतदारसंघ राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आला आहे.

रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध करत आज निंबाळकर कुटुंबीयांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी नारळ फोडला. निंबाळकर कुटुंबीयांनी घेतलेल्या या निर्णयामुळे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना मोठा धक्का बसला आहे. आज फलटणच्या राम मंदिरात रामराजे यांचे चिरंजीव अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांनी धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचाराचा नारळ वाढवला. यावेळी संजीव नाईक निंबाळकर यांच्या पत्नी आणि चिरंजीव ही उपस्थित होते.

तर दुसरीकडे रामराजे नाईक निंबाळकर अजित पवार गटात असल्याने अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी नारळ फोडल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. भाजप उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सुरुवातीपासूनच विरोध होत आहे.

रामराजेंच्या कुटुंबातील सदस्यांची उपस्थिती

आज फलटणच्या प्रसिद्ध राम मंदीरात धैयशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी विजयसिंह मोहिते पाटील देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेतराजे, संजीव राजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव आणि पत्नी तसेच रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सुभद्रा नाईक निंबाळकर उपस्थित होते.

नाशिकमध्ये नवा ट्विस्ट! भुजबळांनी पुन्हा सांगितला दावा

माढा लोकसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी?

माढा लोकसभा मतदारसंघात 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी सहज विजय मिळवला होता मात्र यंदा त्यांच्यासाठी माढाचा पेपर टफ असल्याचं बोललं जात आहे. मोहिते पाटील कुटुंब खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात गेल्याने माढा लोकसभा मतदारसंघात सर्व राजकीय समीकरणे बदलली आहे. यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube