हिंदुत्व सोडलंय, गाण्यात जय भवानी का आणावं; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर पुन्हा वार

हिंदुत्व सोडलंय, गाण्यात जय भवानी का आणावं; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर पुन्हा वार

Devendra Fadanvis Criticize Udhhav Thackery : ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अन् जोरदार प्रचार सुरू झालेला असतानाच निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे ( Udhhav Thackery ) गटाला जोरदार धक्का दिला आहे. ठाकरेंनी मशाल चिन्हासाठी तयार केलेल्या गाण्यातून ‘हिंदू’ आणि ‘जय भवानी’ शब्दांवर निवडणूक आयोगाने ( Election Commission) आक्षेप घेतला आहे. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी ( Devendra Fadanvis ) उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

संविधान वाचवण्यासाठी मोदींचा पराभव करणं गरजेचं; पृथ्वीराज चव्हाणांची सडकून टीका

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, हा उद्धव ठाकरे आणि निवडणूक आयोग यांच्यातील प्रश्न आहे मात्र मी एवढं म्हणेन की ज्यांनी हिंदुत्व सोडला आहे त्यांनी आपल्या कामांमध्ये तरी जय भवानी का आणावं असा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच त्यांनी रामाच्या आणि बजरंग बली च्या नावावर मत मागितल्याचा आरोप भाजपवर केला आहे तो प्रश्न त्यांनी निवडणूक आयोगाला विचारावा.

कृषी कायदे मागे घ्यावे लागल्याने मोदी शेतकऱ्यांचा सूड घेताहेत; पृथ्वारीज चव्हाणांचा हल्लाबोल

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मात्र आयोगाच्या या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. तुळजाभवानी माता महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत ‘जय भवानी’ शब्द काढणार नाही. भवानी मातेचा अपमान सहन करणार नाही, अशा शब्दांत निवडणूक आयोगालाच आव्हान दिले. उद्धव ठाकरेंच्या या पवित्र्यानंतर निवडणूक आयोग आणि ठाकरे गटात संघर्ष उडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

निवडणूक आयोगाचे पत्र मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी आयोगाच्या कारभारावत संताप व्यक्त केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह धर्म आणि देवाच्या नावावर मते मागतात. मध्य प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटकात निवडणूक झाली त्यावेळी आम्ही निवडणूक आयोगाकडे विचारणा केली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज