Election Commission of India : ‘शादी मे जरूर आना’ फेम अभिनेता होणार EC चा नॅशनल आयकॉन

  • Written By: Published:
Election Commission of India : ‘शादी मे जरूर आना’ फेम अभिनेता होणार EC चा नॅशनल आयकॉन

Actor RajKummar Rao Appointed As a National Icon For EC : भारतातील पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा (Assembly Election) निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने ‘शादी मे जरूर आना’ फेम राजकुमार राववर (Actor Rajkumar Rao)  मोठी जबाबदारी सोपावली आहे. याबाबतची अधित घोषणा उद्या (दि. 26) केली जाणार असून, राजकुमार रावला पाच राज्यातील विधानसभांच्या निवडणुकांसाठी नॅशनल आयकॉन (Election Commission National Icon) म्हणून निवडले जाणार आहे. तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराममध्ये नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून, त्याचे निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 161 दशलक्षाहून अधिक लोक मतदान करणार आहेत.

 

यावर्षी ऑगस्टमध्ये निवडणूक आयोगाने माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला आगामी लोकसभेच्या निवडणुकांना समोर ठेवत राष्ट्रीय आयकॉन म्हणून नियुक्त केले आहे. त्यानंतर आता देशभरातील पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा डोळ्यासमोर ठेवत निवडणूक आयोगाने लोकप्रिय अभिनेता राजकुमार राव याच्या मोठी जबाबदारी देत त्याची राष्ट्रीय आयकॉन म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

“PM मोदींचा एक फोन येऊ द्या, आरक्षणाचा जीआर घेऊन…” : जरांगे पाटलांचं मोठं विधान

ज्यावेळी एखाद्या व्यक्तीची निवडणूक आयोग राष्ट्रीय आयकॉन म्हणून नियुक्ती करतो. त्यावेळी संबधित सेलिब्रिटीला निवडणूक आयोगासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करावी लागते. साधारण हा करार तीन वर्षांसाठी असतो असे सांगितले जाते. या करारानंतर संबंधित सेलिब्रिटी जाहिरातींद्वारे, त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे किंवा इतर कार्यक्रमांद्वारे लोकांना मतदानाबाबत जागरूक करण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्याचे काम करतो.

देशातील मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून, मिझोरम आणि मध्य प्रदेशमध्ये 7 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबर तर, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 17 नोव्हेंबर रोजी पडणार आहे. तर, राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबर आणि तेलंगणा मध्ये 30 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, 3 डिसेंबर रोजी सर्व राज्यांच्या मतदानाचा निकाल जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी दिली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube