“PM मोदींचा एक फोन येऊ द्या, आरक्षणाचा जीआर घेऊन…” : जरांगे पाटलांचं मोठं विधान
जालना : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोन येऊ द्या, हे तिघे जीआर घेऊन अंतरवाली सराटीमध्ये येतील, असं म्हणत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना टोला हाणला. यावेळी त्यांनी थेट पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी आता आरक्षण प्रश्नात लक्ष घालावे अशी विनंती केली. (Manoj Jarange Patil requested Prime Minister Narendra Modi to look into the Maratha reservation issue)
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. आता आरक्षण मिळेपर्यंत ना अन्, ना पाणी ना वैद्यकीय उपचार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत काल (24 ऑक्टोबर) संपली. त्यानंतर आज जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतची घोषणा केली. यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी थेट पंतप्रधान मोदी यांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी पुन्हा एकदा मागणी केली.
देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीला यश! निलेश राणेंची नाराजी दूर; निवृत्तीचा निर्णय 24 तासात मागे
जरांगे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि मराठ्यांना आरक्षण देणार असल्याचं सांगितलं. पण 40 तर दिवसामध्ये तर सरकारनं काहीच केलेलं दिसत नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांचा सन्मान करतो. ते दिलेला शब्द पाळतात असं म्हणतात. पण त्यांना कोणीतरी आरक्षण देण्यापासून थांबवत आहे. ते लोक कोण आहेत हे शोधावं लागेल. आता आमच्या लेकरा-बाळांचा प्रश्न आहे. त्यामुळे मी उपोषणावर ठाम आहे. इतरांना जसं दिलं तसंच आरक्षण द्यायला हवं. मराठा समाज आरक्षणाच्या सर्व निकषांमध्ये बसतो. त्यामुळे सतत कोणीही कायद्याचा उल्लेख करून टाळाटाळ करू नये.
जरांगे पाटलांकडून पुन्हा उपोषणाचा एल्गार! गिरीश महाजनांची अखरेच्या क्षणापर्यंतची शिष्टाई निष्फळ
आम्ही मागच्यावेळी पंतप्रधान मोदी यांना आरक्षणाच्या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. हा विषय गंभीर आहे, मराठा समाजाची संख्या मोठी आहे. त्यामुळे याची दखल घ्या असं आम्ही म्हणत होतो. पूर्वी वाटायचे मोदींना गोरगरिबांच्या प्रश्नांची जाण आहे. पण ते खरोखरच गरिबांची दखल घेतात का याची आता शंका येत आहे, पण मी सांगतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर मोदींना बैठक घ्यायची गरज नाही. त्यांचा एक फोन या तिघांना येऊ द्या. आरक्षण जाहीर झाल्याचा कागद चार वाजेपर्यंत नाही आला तर बघा. आरक्षण दिल्याची ब्रेकिंग बातमी होईल, असा दावा त्यांनी केला.