उपाध्यक्षपदासाठीही NDA चा मोठा गेम; ‘या’ पक्षाला संधी देत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम?

उपाध्यक्षपदासाठीही NDA चा मोठा गेम; ‘या’ पक्षाला संधी देत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम?

Lok Sabha Deputy Speaker Post : लोकसभेच्या अध्यक्षपदाचा मुद्दा आता निकाली (Lok Sabha Speaker) निघाला आहे. संसदेत आवाजी मतदानाने एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला यांची (Om Birla) अध्यक्षपदी निवड झाली. यानंतर आता उपाध्यक्षपदाची चर्चा (Lok Sabha Deputy Speaker Post) सुरू झाली आहे. अध्यक्षांना पाठिंबा देण्याच्या बदल्यात विरोधकांनी उपाध्यक्षपद मागितले होते. मात्र यावर एकमत झाले नाही. त्यामुळे अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीने  (INDIA Alliance) उमेदवार दिला होता. आता याच उपाध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली आहे.

उपाध्यक्षपद कुणाला मिळणार अशी चर्चा सुरू असतानाच मोठी बातमी आली आहे. उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला नाही तर एनडीए स्वतःकडेच (NDA Government) ठेवणार असल्याची माहिती आहे. असे करून एनडीए आतापर्यंत चालत आलेली परंपरा तोडेल. आता या मुद्द्यावरही सरकार आणि विरोधकांमध्ये वादंग होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारलाही मित्र पक्षांना खुश करायचे असल्याने असा निर्णय घेणं भाग पडणार आहे.

Loksabha Election Result : भाजप न हारले न जिंकले; 400 पारची गणितं कुठे आणि कशी चुकली?

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार उपाध्यक्ष पदासाठी एनडीए आघाडी लवकरच उमेदवाराच्या नावाची घोषणा करू शकते. सरकारच्या या निर्णयानंतर विरोधक सुद्धा आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. आघाडीतील सर्वात मोठा पक्ष भाजप उपाध्यक्षपद टीडीपी किंवा जेडीयूतील एखाद्या नेत्याला देण्याची शक्यता जास्त आहे. कारण अध्यक्षपदावर भाजपने आधीच कब्जा करून तेथे ओम बिर्ला यांच्या रूपात आपला उमेदवार बसवला आहे.

उपाध्यक्षपदी टीडीपीला संधी?

सरकार स्थापन झाल्यानंतर टीडीपीने (TDP) अध्यक्षपदाची मागणी भाजपकडे केली होती. मात्र भाजपने याबाबतीत ताठर भूमिका घेत महत्त्वाचे पद आपल्या पदरात पाडून घेतले. आता उपाध्यक्षपद चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांच्या तेलुगू देसम यांच्या पक्षाला मिळण्याची शक्यता आहे. इतिहासात डोकावून पाहिलं तर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळातही लोकसभेचे स्पीकरपद तेलुगू देसमचे जीएमसी बालयोगी यांच्याकडे होते. यावेळी बालयोगी यांचे पुत्र हरीश यांना मिळेल असे सांगितले जात आहे. तेलुगू देसम पक्षाप्रती विश्वास आहे हे दाखवण्यासाठी भाजप हा निर्णय घेऊ शकतो. परंतु सरकारच्या या खेळीने विरोधक नाराज होण्याची शक्यता आहे.

विरोधकही आक्रमक होणार

याआधी प्रोटेम स्पीकरपद मिळवण्यात विरोधकांना अपयश आले होते. आता निदान उपाध्यक्षपद तरी मिळावं यासाठी विरोधी पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. तसं पाहिलं तर उपाध्यक्षपद विरोधी पक्षांकडेच जाते. ही नेहमीची परंपरा आहे. तसेच अध्यक्षपदही सत्ताधारी पक्षाला मिळते ही नेहमीची परंपरा आहे. यंदा मात्र विरोधकांनी अध्यक्षपदासाठी उमेदवार देत ही परंपरा तोडली होती. त्यामुळे आता एनडीए उपाध्यक्षपद विरोधकांना देईल याची शक्यता कमीच दिसत आहे. एनडीएने जर हे पद आपल्या सहकारी पक्षाला दिले तर ही परंपरा देखील तुटणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज