Rahul Gandhi यांचा मोठा दावा; एनडीएचे काही लोक आमच्या संपर्कात, छोटी चूकही सरकार पाडू शकते

Rahul Gandhi यांचा मोठा दावा; एनडीएचे काही लोक आमच्या संपर्कात, छोटी चूकही सरकार पाडू शकते

Rahul Gandhi claim some people in contact with INDIA from NDA : देशामध्ये लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर एनडीएच (NDA) सरकार स्थापन झालं आहे. मात्र यामध्ये 2019 च्या तुलनेत भाजपला 2024 मध्ये कमी जागा मिळाल्या. त्यामुळे विरोधकांकडून टीका होत आहे काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी फायनान्शिअल टाईम्स या वृत्तपत्राला मुलाखत देताना भाजपवर टीका करत मोठा दावा केला आहे. राहुल गांधी म्हणाले आहेत की,एनडीएमधील काही लोक त्यांच्या संपर्कात आहेत.

नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?

यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की भाजपच्या खासदारांची संख्या एवढी कमी आहे. त्यामुळे एनडीए सरकार अत्यंत नाजूक स्थितीमध्ये आहे. एक छोटीशी चूक देखील सरकार पाडू शकते. फक्त एखाद्या पक्षाने बाहेर पडण्याची पडण्याचा उशीर आहे. त्याचबरोबर इंडियाच्या आघाडीमध्ये असलेल्या पक्षांमध्ये असंतोष असल्याने यातील काही लोक आमच्या संपर्कात आहेत. असा दावा राहुल गांधी यांनी केला.

ब्रेकअप झालं, राग डोक्यात शिरला अन् भररस्त्यात प्रेयसीला संपवलं; वसईतलं थरकाप उडवणारं हत्याकांड

मात्र यावर सविस्तर बोलणं राहुल यांनी टाळलं आहे. पुढे राहुल गांधींनी भाजपवर टीका करताना म्हटलं की, भाजपाला वाटत होतं की, ते लोकांमध्ये द्वेष पसरवतील त्याचा त्यांना फायदा होईल मात्र या निवडणुकीत लोकांनी त्यांचा हा गैरसमज दूर केला. तसेच 2014 आणि 2019 मध्ये ज्याप्रमाणे मोदी लाट होती. ती देखील आता निष्प्रभ ठरली आहे.

धक्कादायक! टी 20 विश्वचषकात मॅच फिक्सिंगचा प्रयत्न; ‘त्या’ खेळाडूला विविध नंबर्सवरुन कॉल..

त्याचबरोबर पुढे राहुल गांधी यांनी असं देखील म्हटलं की, इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाला असतं. मात्र निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकारने दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं काँग्रेसचे काही बँक खाती गोठवण्यात आली. हे सर्व गोष्टींचा परिणाम देखील इंडिया आघाडीला झालेल्या मतदानावर झाला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube