धक्कादायक! टी 20 विश्वचषकात मॅच फिक्सिंगचा प्रयत्न; ‘त्या’ खेळाडूला विविध नंबर्सवरुन कॉल..
T20 World Cup 2024 : टी 20 विश्वचषकात आता साखळी फेरीतील सामने संपले (T20 World Cup 2024) आहेत. उद्यापासून सुपर 8 फेरीतील सामने सुरू होणार आहेत. मात्र, या फेरीआधीच क्रिकेट विश्वात खळबळ (Cricket News) उडवून देणारी बातमी धडकली आहे. एका रिपोर्टनुसार साखळी फेरीतील सामन्यांदरम्यान मॅच फिक्सिंगचा प्रयत्न झाला होता. यासाठी युगांडाच्या खेळाडूकडे (Match Fixing) अनेक कॉल आले होते. मात्र या खेळाडूने हुशारी दाखवत या प्रकाराची तक्रार थेट आयसीसीकडे (ICC) केली. यामुळे पुढील अनर्थ टळला.
पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, विश्वचषकातील साखळी फेरीतील सामन्यांदरम्यान युगांडा संघातील (Uganda Cricket Team) एका खेळाडूला मॅच फिक्सिंगसाठी संपर्क साधण्यात आला होता. यासाठी केनियाच्या एका खेळाडूने वेगवेगळ्या नंबर्सवरून या खेळाडूला कॉल केले होते. विशेष म्हणजे, हा प्रकार लक्षात आल्यानंतर युगांडाच्या खेळाडूने तत्काळ आयसीसीकडे तक्रार केली.
मोठी बातमी : माझा शेवटचा T20 विश्वचषक; संघाच्या खराब कामगिरीनंतर ट्रेंट बोल्टचा ‘रामराम’
आयसीसीशी संबंधित एका सूत्राने सांगितले की यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. मोठ्या क्रिकेट संघांच्या तुलनेत एसोसिएट देशांच्या क्रिकेट संघांना टार्गेट करणं खूप सोपं असतं. या प्रकारानंतर क्रिकेट विश्वात मात्र मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकाराची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
युगांडा संघाने विश्वचषकात एकूण चार सामने खेळले आहेत. या दरम्यान फक्त एकच सामना जिंकता आला. तीन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. युगांडाकडे फक्त दोन गुण होते. यामुळेच संघ एलिमिनेटेड झाला. या स्पर्धेत युगांडाने फक्त पापुआ न्यू गिनी विरुद्ध विजय मिळवला होता. अफगाणिस्तान, वेस्टइंडिज आणि न्यूझीलंड या संघांनी युगांडाचा पराभव केला होता.
क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंगचा इतिहास जुनाच आहे. क्रिकेटमध्ये असे गैरप्रकार रोखण्यासाठी आयसीसीने नियम अत्यंत कठोर केले आहेत. याच कारणामुळे काही खेळाडूंवर कठोर कारवाई देखील झाली आहे. पाकिस्तानच्या एका माजी खेळाडूवर क्रिकेट बंदी घालण्यात आली होती. आताही असाच प्रकार घडून क्रिकेटला मोठा डाग लागला असता. मात्र युगांडाच्या खेळाडूने प्रसंगावधान दाखवले.
पुढील धोका ओळखला आणि हा प्रकार आयसीसीच्या अधिकाऱ्यांच्या कानावर घातला. आता पुढील कार्यवाही आयसीसीकडून होईलच पण, यानिमित्ताने क्रिकेटमध्ये असे गैरप्रकार होण्याचा धोका आजही आहे. मॅच फिक्सिंगसारख्या प्रकरणात कठोर कारवाई झाल्यानंतरही असे प्रकार करण्यास धजावणाऱ्या जरब बसलेली नाही असेच म्हणावे लागेल.
T20 World Cup : विंडीजचा पहिला विजय! नवख्या पापुआ न्यू गिनी संघावर मात