अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची दमछाक, सर्वोच्च धावसंख्या करत वेस्ट इंडिजने दिला धक्का

अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची दमछाक, सर्वोच्च धावसंख्या करत वेस्ट इंडिजने दिला धक्का

WI vs AFG T20 WC : आज T20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2024) 40 व्या सामन्यात वेस्ट इंडिजने (West Indies) अफगाणिस्तानला धक्का (Afghanistan) देत 104 धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने अनेक विक्रम मोडले आहे.

प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 218 विक्रमी धावसंख्या उभारली होती. याच्या प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ 16.2 षटकात 114 धावांवर गारद झाला. वेस्ट इंडिजकडून निकोलस पूरनने (Nicholas Pooran) शानदार खेळी करत अफगाणिस्तान संघाच्या गोलंदाजांची चांगलीच दमछाक केली.

वेस्ट इंडिजने T20 WC 2024 ची सर्वोच्च धावसंख्या केली

या सामन्यात नाणेफेक जिंकून अफगाणिस्तान संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता मात्र वेस्ट इंडिजने या सामन्यात  2024 च्या T20 विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या करत अफगाणिस्तानला धक्का दिला. वेस्ट इंडिजकडून  निकोलस पुरनने 98 धावांची दमदार खेळी केली. तर जॉन्सन चार्ल्सने 27 चेंडूंमध्ये 8 चौकारांच्या मदतीने 43 धावा केल्या तर शाई होपने 25 आणि रोव्हमन पॉवेलने 26 धावा केल्या. अशाप्रकारे वेस्ट इंडिज संघाने 218 धावा केल्या.

219 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या संघाची सुरुवात खराब झाली. संघाचा स्टार फलंदाज रहमानउल्ला गुरबाज शून्यावर बाद झाला यानंतर  इब्राहिम झद्रानने डाव सांभाळला त्याने 28 चेंडूत 38 धावा केल्या मात्र दुसऱ्याकडून अफगाणिस्तानच्या इतर फलंदाजांची साथ त्याला मिळाली नाही. गुलबदिनने 7 धावा केल्या तर जमतुल्ला उमरझाईने 19 चेंडूत 23 धावा केल्या.  कर्णधार राशिद खानलाही केवळ 18 धावा करता आल्या. वेस्ट इंडिजकडून ओबेड मॅकॉयने 3 षटकात 14 धावा देत 3 बळी घेतले तर गुडाकेश आणि अकीलने 2-2 विकेट्स आपल्या नावावर केल्या.

तारीख ठरली! ‘या’ दिवशी होणार मंत्रिमंडळ विस्तार; कुणाला मिळणार संधी?

या विजयासह  T20 विश्वचषक 2024 मध्ये वेस्ट इंडिजने लीग सामन्यात चार पैकी चार सामने जिंकून विजयाचा चौकार मारला आहे. ग्रुप सीमधून सुपर 8 साठी वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तानने कॉलिफाय केला आहे तर ग्रुप ऐ मधून भारत आणि अमेरिकाने कॉलिफाय केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज