अफगाणिस्तानची हॅट्ट्रीक! PNG वर एकतर्फी विजय अन् न्यूझीलंड वर्ल्डकपमधून बाहेर
AFG vs Papua New Guinea : टी विश्वचषकात आणखी एक उलटफेर पाहण्यास मिळाला. या स्पर्धेतील 29 व्या सामन्यात अफगाणिस्तानने आपली विजयी घोडदौड कायम राखत पापुआ न्यू गिनी संघाचा दारुण पराभव केला. या विजयानंतर अफगाणिस्तानने हॅट्ट्रीक साधली मात्र न्यूझीलंडला जोरदार धक्का बसला. अफगाणिस्तानच्या या विजयानंतर सुपर 8 फेरीत प्रवेशाच्या न्यूझीलंडच्या उरल्यासुरल्या आशाही मावळल्या. अफगाणिस्तानने मात्र या विजयासह सुपर 8 मध्ये प्रवेश निश्चित केला.
या सामन्यात नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानच्या धारदार गोलंदाजीसमोर पापुआ न्यू गिनी संघाच्या फलंदाजांचा फार काळ टिकाव लागला नाही. अख्खा संघ अवघ्या 95 धावांत ऑल आऊट झाला. सुपर 8 फेरीत प्रवेश करण्यासाठी अफगाणिस्तानला एक विजय आणी 96 धावांची गरज होती. अफगाणिस्तानने या आव्हानाचा सहज पाठलाग करत एकतर्फी विजय मिळवला.
ENG vs Oman : फक्त 19 चेंडूत सामना जिंकला; इंग्लंडचा ओमानवर मोठ्ठा विजय
या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्ताने 15.1 ओव्हरमध्ये 101 धावा केल्या. गुलाबदीन नायबने सर्वाधिक 49 धावा केल्या. याआधी फलंदाजी करताना पापुआ न्यू गिनी संघाला फक्त 95 धावा करता आल्या. पापुआ न्यू गिनी संघाकडून किप्लीन डोरिगाने 27 धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त अन्य कुणालाही विशेष काही करता आले नाही. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांना चांगलाच घाम फोडला.
अफगाणिस्तानकडून फजलहक फारुकीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. नवीन उल हकने दोन तर नूर अहमदने 1 विकेट घेतली. पापुआ न्यू गिनीचे चार फलंदाज तर धावबाद झाले. त्यामुळे पापुआ न्यू गिनी संघाला फक्त 95 धावा करता आल्या. अफगाणिस्तानने सात गडी आणि 29 चेंडू राखून एकतर्फी विजय मिळवला. या विजयानंतर अफगाणिस्तानने सुपर 8 फेरीत प्रवेश केला आहे.
भारताविरुद्धचा पराभव जिव्हारी; ‘या’ तीन खेळाडूंवर पाकिस्तान बोर्ड करणार कारवाई?
न्यूझीलंड विश्वचषकातून बाहेर
अफगाणिस्तानने पापुआ न्यू गिनी संघाचा पराभव करत सुपर 8 फेरीत प्रवेश केला. मात्र त्यांच्या या विजयाचा न्यूझीलंडला मोठा फटका बसला. न्यूझीलंडचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. वेस्टइंडिज आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ क गटात होते. या गटातून सुपर 8 मध्ये पोहोचणारा वेस्टइंडिज हा पहिलाच संघ ठरला आहे. न्यूझीलंडने पहिले दोन्ही सामने गमावले होते. अफगाणिस्तानने तीनपैकी तीन सामने जिंकून सहा गुणांसह सुपर 8 फेरीत प्रवेश केला. त्यामुळे आता न्यूझीलंडने राहिलेले दोन्ही सामने जिंकले तरी त्यांना सुपर 8 मध्ये प्रवेश करता येणार नाही.
विंडीजची सुपर 8 मध्ये एन्ट्री
यंदा टी 20 विश्वचषक स्पर्धेत अनेक उलटफेर होताना दिसत आहेत. आताही असाच एक उलटफेर झाला आहे. अटीतटीच्या सामन्यात वेस्टइंडिजच्या खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करत न्यूझीलंडला पराभवाचा धक्का दिला. या विजयानंतर विंडीज संघाने सुपर 8 फेरीत प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे पराभवामुळे न्यूझीलंडचं सुपर 8 फेरीतील प्रवेशाचं गणित डळमळीत झालं आहे. न्यूझीलंडचे आणखी दोन सामने बाकी आहेत मात्र तरीही संघाचा सुपर 8 मधील प्रवेश कठीण झाला आहे. या दोन्ही सामन्यात न्यूझीलंडला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे.