बीडमधील गंभीर घटना! पैशांवरून वाद, तरुणाने जिवलग मित्राची केली हत्या

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात करून पोलिसांनी आरोपीला अटक केली.

  • Written By: Published:
News Photo   2026 02 03T161319.565

बीडमध्ये पुन्हा धक्कादायक प्रकार घडला आहे. (Beed) उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने तरुणाने मित्राची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. डोक्यात दगड घालून तरुणाने मित्राला जागीच संपवलं. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. बीड पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलोसिांनी आरोपी अतिक गुलाब तांबोळीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

पाटोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दगडवाडी गावच्या शिवारातही घटना घडली होती. याठिकाणच्या बीड ते शिरूर रोडवर २ फेब्रुवारी रोजी सकाळी एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला होता. चाँद अल्हाहुद्दीन तांबोळी (वय ३०, रा. रायमोहा, ता. शिरूर) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव होते. तो व्यवसायाने पेंटर होता. या तरुणाची डोक्यात दगड मारून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मोठी बातमी! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडं बीड अन् पुण्याचं पालकमंत्रीपद

अज्ञात आरोपीविरोधात कोणतेही पुरावे नसताना हा गुन्हा उघडकीस आणणे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक तयार केलं. या पथकाने काही तासांच प्रकरणाचा उलगडा केला. तपासादरम्यान संशयाची सुई अतिक गुलाब तांबोळी (रा. ईस्लामपुरा पेठ, बीड) याच्याकडे वळली. पोलिसांनी तातडीने हालचाली करत आरोपीला बीडच्या शासकीय रुग्णालय परिसरातून ताब्यात घेतलं.

सुरुवातीला आरोपीने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. आरोपी अतिकने मृत चाँद तांबोळी याच्याकडून काही पैसे हातउसणे घेतले होते. चाँदने वारंवार पैशांची मागणी करत पैसे परत द्यावे यासाठी तगादा लावत होता. याच वादातून संतापलेल्या अतिकने चाँदचा काटा काढण्याचे ठरवलं आणि दगडवाडी शिवारात डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. पोलिसांनी अवघ्या काही तासांच या हत्याकांडाचा छडा लावला. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

follow us