T20 WC 2024: वर्ल्डकप सामन्यातील पहिलीच सुपर ओव्हर; नामिबियाचा ओमानवर थरारक विजय

T20 WC 2024: वर्ल्डकप सामन्यातील पहिलीच सुपर ओव्हर; नामिबियाचा ओमानवर थरारक विजय

Nambia vs Oman T20 World Cup : नाबियामध्ये टी-२० वर्ल्डकप संघाच्या पहिल्याच सुपर ओव्हर सामन्यात विजयी सलामी दिली.  या थरारक सुपर ओव्हरने ओमानचा पराभव केला. टी-२० विश्वचषकातील ओमान विरूद्ध नामिबियाच्या तिसऱ्या सामन्यातच सुपर ओव्हर पाहायला मिळाली. या सामन्यात नामिबियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. (T20 World Cup) दरम्यान, प्रथम गोलंदाजी करताना नामिबियाने ओमानला १९.४ षटकांत १०९ धावांमध्ये ऑल आऊट केलं. तर, दुसऱ्यांदा फलंदाजी करताना ओमानचा संघ २० षटकांत १०९ धावा करू शकला. (Nambia vs Oman) त्यामुळे सामना बरोबरीत राहिला आणि सुपर ओव्हर पाहायला मिळाली.

सामना टाय झाला    T20 World Cup : टी 20 विश्वचषकात युवा खेळाडूंचा भरणा; मॅचविनर खेळाडूंची एन्ट्री

या सामन्यावेळी नामिबियाचा संघ १०९ धावांचा पाठलाग सहज करेल असं वाटत होतं. थोड्या-थोड्या अंतराने नामिबियाने विकेट गमावल्या. त्यानंतरही लक्ष्य सहज गाठण्यासारखी परिस्थिती होती. दरम्यान, अखेरच्या षटकात नामिबियाला विजयासाठी ५ धावांची गरज होती. ओमानकडून गोलंदाज मेहर खानने भेदक गोलंदाजी करत धावांना ब्रेक लावला. त्याने पहिल्या तीन चेंडूत दोन विकेट घेत सामना रोमांचक केला. नामिबियाला शेवटच्या चेंडूवर दोन धावा करायच्या होत्या आणि सामना एका धावेवर टाय झाला. एक धाव घेतानाच धावबाद करत सामना जिंकण्याची मोठी संधी ओमानकडे होती. मात्र, यष्टीरक्षकाचा अंदाज चुकल्याने चेंडू बाजूने गेला आणि सामना टाय झाला.

२१ धावांची मोठी धावसंख्या

नामिबियाने सुपर ओव्हरमध्ये अनुभवी फलंदाज डेव्हिड व्हिसा आणि इरॅस्मस ही जोडी फलंदाजीला आली. तर, ओमानकडून अनुभवी गोलंदाज बिलाल खानकडे गोलंदाजी देण्यात आली. पण डेव्हिड व्हिसाची फटकेबाजी बिलालच्या गोलंदाजीवर चांगलीच भारी पडली. नामिबियाकडून या दोन्ही फलंदाजांनी २१ धावा केल्या. व्हिसाने पहिल्याच दोन चेंडूवर चौकार आणि षटकार लगावत फटकेबाजी सुरू केली. तर, अखेरच्या दोन चेंडूंवर इरॅस्मसने चौकार लगावत २१ धावांची मोठी धावसंख्या उभारली.

विजय आपल्या बाजूने केला

सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना २२ धावांचा पाठलाग करताना ओमानची सुरूवात खराब झाली. पुन्हा एकदा नामिबियाकडून अनुभवी खेळाडू वीजा गोलंदाजीसाठी आला. भेदक गोलंदाजी करत नामिबियाला पहिल्या तीन चेंडूतच विजय निश्चित केला. व्हिसाच्या तिसऱ्या चेंडूवर नसीम खुशी क्लीन बोल्ड झाला. पुढच्या दोन चेंडूवर व्हिसाने एक-एक धाव दिली. तर, अखेरच्या चेंडूवर ओमानकडून अकिबने षटकार लगावला खरा पण तोपर्यंत नामिबियाने विजय आपल्या बाजूने केला होता.

सुपर ओव्हर्स

१. न्यूझीलंड – ७ बाद १७४/7, श्रीलंका ६ बाद १७४ – श्रीलंकेने सुपर ओव्हर जिंकली, १ बाद १३ – १ बाद ७ – कँडी, २०१२, वेस्ट इंडिज १३९ (१९.३ षटके) – न्यूझीलंड ७ बाद १३९ (२० षटके) – वेस्ट इंडिजने सुपर ओव्हर जिंकली, १९/० – १७/० – कँडी, २०१२, ओमान १०९ (१९.४ षटके) – नामिबिया ७ बाद १०९ (२० षटके) – नामिबियाने सुपर ओव्हर जिंकली, २१/० – १ बाद १० – बार्बाडोस, २०२४

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज