T20 World Cup : टी 20 विश्वचषकात युवा खेळाडूंचा भरणा; ‘या’ मॅचविनर खेळाडूंची एन्ट्री

T20 World Cup : टी 20 विश्वचषकात युवा खेळाडूंचा भरणा; ‘या’ मॅचविनर खेळाडूंची एन्ट्री

T20 World Cup 2024 : टी 20 विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यास आता फक्त चार दिवस (T20 World Cup 2024) शिल्लक राहिले आहेत. सर्व संघ अमेरिका आणि वेस्टइंडीज मध्ये दाखल झाले आहेत. स्पर्धा सुरू झाल्यानंतर दिग्गज खेळाडूंप्रमाणेच नव्या चेहऱ्यांवरही लक्ष राहणार आहे. आज आपण अशाच नव्या खेळाडूंची माहिती घेणार आहोत जे आपल्या क्षमतेवर संघाला विजय मिळवून देऊ शकतात. यंदा विश्वचषकात पहिल्यांदाच वीस संघ सहभागी झाले आहेत. एकूण 55 सामने या स्पर्धेत खेळले जाणार आहेत.

यशस्वी जैस्वाल

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांत चांगली कामगिरी करत आहे. त्याचा आक्रमक खेळ आणि दबावात चांगली कामगिरी करण्याची क्षमता या कौशल्यामुळे तो संघातील विश्वसनीय खेळाडू म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. आगामी टी 20 विश्वचषकात यशस्वी टीम इंडियासाठी (Team India) उपयुक्त फलंदाज ठरू शकतो.

टी 20 विश्वचषकाचं रिपोर्ट कार्ड; ‘या’ संघांवर भारी टीम इंडियाचे ‘वाघ’

हॅरी ब्रुक

इंग्लंड संघाचा 23 वर्षीय फलंदाज हॅरी ब्रुकने काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत जबरदस्त खेळ केला. हॅरी वेगाने रन करण्यात आणि आक्रमक फलंदाजी करू शकतो. इंग्लंडला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. त्याची फलंदाजी इंग्लिश टीमसाठी फायदेशीर ठरू शकते. इंग्लंडच्या संघात यंदा अनेक चांगल्या खेळाडूंना संधी मिळाली आहे. त्यामुळे संघ टी 20 विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

कंवरपाल ताथगुर

कॅनडा संघातील वेगवान गोलंदाज कंवरपाल आपल्या खास शैलीतील गोलंदाजीवर ओळखला जातो. त्यामुळे आगामी टी 20 विश्वचषक स्पर्धेत अनेक फलंदाजांसाठी तो आव्हानात्मक ठरू शकतो. कॅनडा संघातील खेळाडू फारसे अनुभवी नाहीत. त्यांना क्रिकेट खेळण्याचा फारसा अनुभव नाही. त्यामुळे या स्पर्धेत त्यांचा संघ कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

‘विषय हार्ड’ तेलुगू अन् मराठी चित्रपटसृष्टी एकत्र; ‘येडं हे मन माझं’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

बांग्लादेशच्या संघातील फलंदाज तौहीद हृदयोय त्याच्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो. बांग्लादेश प्रीमियर लीग स्पर्धेत तौहीद चांगल्या फॉर्ममध्ये होता. संघाला अडचणीच्या काळात सावरण्याची त्याची क्षमता आहे. आगामी काळात संघात तो एक महत्वाचा खेळाडू म्हणून पुढे येऊ शकतो. यंदा बांग्लादेशच्या संघात चांगल्याड मॅच विनर खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज