विंडीजचा पराक्रम! मालिकेतील तिन्ही सामने जिंकत दक्षिण आफ्रिकेचा सुपडा साफ

विंडीजचा पराक्रम! मालिकेतील तिन्ही सामने जिंकत दक्षिण आफ्रिकेचा सुपडा साफ

WI vs RSA 3rd T20I : टी 20 विश्वचषकाआधी दक्षिण आफ्रिका आणि वेस्टइंडिज यांच्यात झालेल्या तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत वेस्टइंडिजने दक्षिण आफ्रिकेचा 3-0 असा धुव्वा उडवला. तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यातही विंडीज संघाने विजय मिळवला. वान डुर डुसैनच्या नेतृत्वातील दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 8 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेने 167 धावा केल्या. यानंतर वेस्टइंडिजने फक्त 13.5 ओव्हर्समध्ये लक्ष्य गाठत विजय संपादन केला. (West Indies beat South Africa in 3rd T20 International Match)

वेस्टइंडिजने मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 28 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात 16 धावांनी आफ्रिकेचा पराभव झाला होता. या दोन सामन्यात विजय मिळवत विंडीजने तेव्हाच मालिका जिंकली होती. त्यामुळे तिसरा सामना विंडीजसाठी फक्त औपचारिकतेचा होता. परंतु, या सामन्यातही वेस्टइंडिजच्या खेळाडूंनी दमदार खेळ करत आफ्रिकेला नमवले.

वर्ल्डकपसाठी वेस्टइंडिज सज्ज; संघात अष्टपैलू खेळाडूंचा भरणा पण, मॅचविनरच गायब

तिसऱ्या सामन्यात आफ्रिका संघाचा कर्णधार डुसैनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आफ्रिकेने 20 ओव्हर्समध्ये सात विकेट्सच्या मोबदल्यात 163 धावा केल्या. डुसैनने 51 धावा केल्या. वियान मुल्डरने 36 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त अन्य फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत. वेस्टइंडिजकडून ओबेड मॅकॉयने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. शेमर जोसेफ आणि गुडाकेश मोती या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या विंडीज संघाची सुरुवात चांगली राहिली. ब्रँडन किंग आणि जॉन्सन चार्ल्स यांनी पहिल्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी केली. किंग 44 धावा करून बाद झाला. तर चार्ल्सने 69 रन केले. यानंतर कायली मेयर्सने 36 धावा करत नाबाद राहिला. अशा पद्धतीने फक्त 13.5 ओव्हर्समध्येच विंडीज संघाने विजय मिळवला.

T20 World Cup 2024: भारीच, फ्रीमध्ये पाहता येणार टी20 वर्ल्ड कप सामने; जाणून घ्या कसं

टी 20 विश्वचषकासाठी विंडीज सज्ज

दरम्यान, आगामी टी 20 विश्वचषकासाठी वेस्टइंडिज संघ निवडकर्त्यांनी यंदा अष्टपैलू खेळाडूंन संघात घेतले आहे. परंतु, आपल्या फिरकी गोलंदाजीच्या बळावर सामना फिरवण्याची क्षमता असलेल्या सुनील नारायणला संघात घेतलं नाही. या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या स्पर्धेसाठी विंडीजच्या संघात रोवमन पॉवेल (कर्णधार), अल्जारी जोसेफ, जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेज, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, अकील होसेन, शाई होप, शमर जोसेफ, ब्रँडन किंग, गुडाकेश मोती, निकोलस पूरन, आंद्रे रसेल, शेरफेन रदरफोर्ड आणि रोमारियो शेफर्ड या खेळाडूंचा समावेश आहे. 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube