T20 World Cup 2024: भारीच, फ्रीमध्ये पाहता येणार टी20 वर्ल्ड कप सामने; जाणून घ्या कसं

T20 World Cup 2024:  भारीच, फ्रीमध्ये पाहता येणार टी20 वर्ल्ड कप सामने; जाणून घ्या कसं

T20 World Cup 2024 : जूनमध्ये सुरु होणाऱ्या टी20 वर्ल्ड कप 2024 साठी बीसीसीआयकडून (BCCI) भारतीय संघाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. 2 जूनपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मात्र यापूर्वी स्पर्धेचे अधिकृत प्रसारक डिज्नी प्लस हॉटस्टारने (Disney Plus Hotstar) क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.

या घोषणेनुसार देशातील सर्व स्मार्टफोन यूजर्सला टी20 वर्ल्ड कप 2024 (T20 World Cup 2024) चे सर्व सामने फ्रीमध्ये पाहता येणार आहे. गेल्या वर्षी वनडे वर्ल्ड कप 2023 आणि आशिया कप 2023 च्या वेळी देखील डिज्नी प्लस हॉटस्टारने सर्व स्मार्टफोन यूजर्सला फ्रीमध्ये समाने पाहण्याची संधी दिली होती. याचा फायदा देखील कंपनीला मोठ्या प्रमाणात झाला होता. या दोन्ही स्पर्धेला विक्रमी प्रेक्षकसंख्या मिळाली होती. यामुळे कंपनीकडून पुन्हा एकदा यूजर्ससाठी ही घोषणा करण्यात आली आहे.

2 जून 2024 पासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये या स्पर्धेचे आयोजन होणार असून या स्पर्धेत 20 संघ सहभागी होणार आहेत. अमेरिकेतील तीन ठिकाणी आणि वेस्ट इंडिजमधील सहा ठिकाणी सामने खेळवले जाणार आहेत.

भारतीय संघाचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे. तर 9 जूनला पाकिस्तान विरुद्ध भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेत आपला तिसरा सामना 12 जून रोजी अमेरिकेविरुद्ध आणि 15 जून रोजी कॅनडाविरुद्ध भारतीय संघ आपला चौथा सामना खेळणार आहे.

औरंगाबादच्या नामांतरावर न्यायालयाने केलं शिक्कामोर्तब! मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, बाळासाहेब ठाकरे…

या स्पर्धेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.

राखीव खेळाडू :

शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज