Shubman Gill : टी-20 विश्वचषक संघातून शुभमन गिलला का वगळले?; वाचा Inside Story

Shubman Gill पाकिस्तानविरुद्ध गिलने 28 चेंडूत 47 धाव करण्याची एकमेव सामना जिंकून देणारी खेळी केली. पण......

  • Written By: Published:

Why Shubman Gill Ruled Out From T20I World Cup 2026 : भारतात होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. निवडकर्त्यांनी एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार असलेल्या शुभमन गिलला (Shubman Gill) मात्र संघातून डच्चू दिला आहे. गिलला संघात स्थान मिळणार नाही अशी शक्यता अनेक दिवसांपासून वर्तवली जात होती आणि घडलेही तसेच. आज, जेव्हा बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी भारतीय संघ जाहीर केला तेव्हा इंडियन स्कॉडमधून गिलचे नाव गायब होते. शुभमन गिलला टी-20 विश्वचषकातून का वगळण्यात आले त्याच्या इनसाईड स्टोरी जाणून घेऊया…

दोन वर्षांपासून टीम इंडियापासून दूर असलेला इशान किशन परतला, संघात घेण्यासाठी BCCI ला भाग पाडलं

गिलला संधी का नाही मिळाली?

गेल्या 18 टी-20 सामन्यांवर कटाक्ष टाकला तर, या सर्व सामन्यांमध्ये गिलची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. पार पडलेल्या 18 सामन्यांमध्ये गिलने एकही अर्धशतक झळकावले नाही. यात फक्त 2025 मध्ये पाकिस्तानविरुद्ध गिलने 28 चेंडूत 47 धाव करण्याची एकमेव सामना जिंकून देणारी खेळी केली. पण, टॉप ऑर्डरमध्ये खेळताना गिलला मोठ्या धावांची खेळी करता आलेली नाही.

सूर्यकुमार यादवचं गिलवरचं थेट विधान

अजित आगरकर यांनी सांगितले की शुभमन गिल सध्या धावा काढण्यास संघर्ष करत आहे आणि गेल्या वर्ल्डकपमध्येही तो खेळला नव्हता. दरम्यान, गिलच्या वगळण्यावर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, “आम्हाला टाॅपला एक कीपर हवा होता.” आज ज्यावेळी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली त्यावेळी पत्रकार परिषदेत गिलला संघात का समाविष्ट केले नाही असे विचारले असता, कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, गिलला त्याच्या फॉर्ममुळे नाही तर, संघाच्या रचनेमुळे वगळण्यात आले आहे. संघाला वरच्या क्रमांकावर  खेळणारा फलंदाजी आणि विकेटकीपर गरजेचा होता असेही सूर्याने स्पष्ट केले. गिलला संघात न घेण्याचा निर्णय पूर्णपणे संघाच्या लवचिक रणनीतीवर आधारित असून, गिलच्या फॉर्मवर नाही. पुढे सूर्यकुमार म्हणाला की, आम्हाला टॉप ऑर्डरमध्ये एक यष्टिरक्षक हवा होता असे सूर्या म्हणाला. शुभमनच्या गुणवत्तेबद्दल प्रश्नच नसून, तो एक उत्तम खेळाडू आहे.

Kapil Dev On Team India : भारतीय संघाला दोन प्रशिक्षकांची गरज? कपिल देव म्हणतो, प्रत्येकाला पैसे…

कमबॅकच्या सामन्यातही गिलची खेळी असमाधानकारक

काही महिन्यांपूर्वी म्हणजे सप्टेंबरमध्ये झालेला आशिया कपच्या माध्यामातून गिलला भारतीय संघात कमबॅक करण्याची नामी संधी होती. परंतु, त्यातही त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. एवढेच नव्हे तर, नुकत्याच संपलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत गिलची कामगिरी सरासरीपेक्षा कमी असल्याचे दिसून आले. तीन सामन्यांमध्ये गिलने फक्त 4,0 आणि 28 एवढीच धावसंख्याची खेळू करू शकला. लखनौ येथील टी-20 चा सामना रद्द करण्यात आला, तर दुखापतीमुळे गिल पाचवा आणि शेवटचा टी-20 सामना खेळू शकला नाही.

टी-20 विश्वचषकासाठी भारतीय स्कॉडमध्ये कोण कोण? 

फलंदाज – सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग.

यष्टीरक्षक –  इशान किशन, संजू सॅमसन.

अष्टपैलू खेळाडू – अक्षर पटेल (उपकर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे.

फिरकीपटू – वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.

वेगवान गोलंदाज – जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा.

follow us