Video : कपिल, सूर्यकुमार, हरमनप्रीत कौर… टीम इंडियाच्या विजयाची साक्ष देणाऱ्या तीन कॅचेसची कहाणी

एकीकडे रिचर्ड्सच्या बॅटमधून निघणाऱ्या धावा भारतीय संघाची धाकधूक वाढवत असतानाच कर्णधार कपिल देवने गोलंदाजीसाठी मदललाल यांना आमंत्रित केले

  • Written By: Published:
Video : कपिल, सूर्यकुमार, हरमनप्रीत कौर... टीम इंडियाचा विजयाची साक्ष देणाऱ्या तीन कॅचेसची कहाणी

Womens Cricket World Cup & Catches History :  आतापर्यंत तुम्ही Catches Win Matches ऐकले असेल पण, भारतीय संघाची कहाणी काहीशी निराळी आणि वेगळी आहे. इथे अंतिम सामना कॅचेच घेऊन जिंकला जातो. काल (दि. 2) मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर, देशाच्या मुलींनी पुन्हा एकदा हेच सिद्ध केले. कर्णधार हरमनप्रीतने ज्या पद्धतीने धावत जाऊन दक्षिण आफ्रिकेची फलंदाज एन.डी. क्लार्कचा झेल घेतला त्यावरून टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण अंतिम सामन्यात अद्वितीय असते हेच पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. तुम्हाला यावर विश्वास बसत नसेल तर, 1983 च्या फायनलपासून आजपर्यंतची कपिल, सूर्यकुमार यादव आणि आता हरमनप्रीत यांची कॅचेचची कहाणी एकदा वाचाच.

शाब्बास, टीम इंडिया; क्रिकेटचा ‘देव’ सचिनकडूनही भारतीय महिला संघाचं कौतूक

1983 चा अंतिम सामना आणि कपिलचा झेल

1983 मध्ये वेस्ट इंडिजचा संघ क्रिकेटमध्ये अजिंक्य मानला जात असे. त्या काळात या संघाला पराभूत करण्याचा विचारच मूर्खपणाचा होता. परंतु, असे असतानाही त्यावेळी अत्यंत सरासरी मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाने अंतिम फेरीत हे आव्हान स्वीकारले. हरियाणा हरिकेन नावाने ओळखल्या जाणाऱ्या कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला वेस्ट इंडिजकडून मोठ्या धावांचं आव्हान मिळालं होतं. पण, म्हणतात ना तारे आणि नायक प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडतात तसेच 1983 चा विश्वचषकही तारे आणि नायकांची वाट पाहत होता.

बलाढ्य अशा वेस्टइंडिच संघाच्या भेदक गोलंदाजी पुढे भारतीय संघाला अवघ्या 183 धावांचे आव्हान देता आले. वेस्ट इंडिजसाठी हे लक्ष्य लहान होते. विजयाच्या दिशेने मैदानात उतरेला वेस्ट इंडिजच्या खेळाडू पहिल्या बॉलपासून आक्रमक दिसत होते. विवियन रिचर्ड्सच्या तळपत्या बॅटमधून पाठोपाठ चेंडू सीमारेषेच्या बाहेर फटकावला जात होता.

Womens World Cup Prize Money : पोरींनी वर्ल्डकप जिंकला; भारतीय संघावर पैशांचा पाऊस, आकडा ऐकून व्हाल थक्क!

अन् कपिल देव रिचर्ड्सच्या कॅचसाठी ओरडत धावले

एकीकडे रिचर्ड्सच्या बॅटमधून निघणाऱ्या धावा भारतीय संघाची धाकधूक वाढवत असतानाच कर्णधार कपिल देवने गोलंदाजीसाठी मदललाल यांना आमंत्रित केले. त्यावेळी लाल यांनी मिडविकेटला टाकलेल्या चेंडू रिचर्ड्सने टोलवलादेखील पण, त्याचवेळी 30 यार्डाच्या वर्तुळात उभे असलेले कर्णधार कपिल देव इट्स माइन, इट्स माइन असे ओरडत कॅच पकडण्यासाठी धावत सुटले अन् रिचर्डसने टोलवलेला चेंडू अचूक झेलला आणि याच झेलमुळे कपिल देव एकदिवसीय विश्वचषक जिंकणारा पहिला कर्णधारही बनला. भारताच्या भेदक गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणापुढे वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 140 धावात तंबूत परतला आणि भारताने विश्वचषकावर नाव कोरलं.

सूर्यकुमारचा झेल आणि भारताचा विजय

2024 च्या टी-20 विश्वचषकात सूर्यकुमार यादवने असाच एक चमत्कारिक झेल घेतला. जर, सूर्याने तो झेल घेतला नसता तर, टीम इंडिया कदाचित विश्वविजेता होण्यापासून वंचित राहिली असती. या अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर एक अविश्वसनीय झेल घेतला, ज्याला सामना जिंकणारा झेल म्हटले गेले. दक्षिण आफ्रिकेच्या मिलरने हार्दिक पंड्याचा चेंडू लाँग ऑफवर हवेत उंचावला मात्र, सीमारेषेच्या पलिकडे जाणारा चेंडू सूर्याने पहिले हवेत उडवत झेल टिपला हाच अविश्वसनीय झेल भारतीय संघचा विजयाचा टर्निंग पॉईंट ठरला.

वर्ल्डकप सुरु असतानाच स्मृती मानधनाने इतिहास रचला; ठरली जगातील पाचवी खेळाडू

कौरच्या झेलने रचला भारतीय संघाच्या विजयाचा पाया

मुंबईत पार पडलेल्या महिला विश्वचषक सामन्यात दक्षिण अफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्डने शतकी खेळी केली. तिच्या बॅटमधून निघाणाऱ्या धावांमुळे भारतीय संघापुढे मोठं आव्हन उभं ठाकलं होतं. पण, वोल्वार्डने दीप्ती वर्माने टाकलेल्या चेंडू लाँग ऑफकडे टोलवला त्याचवेळी तेथे असलेल्या अमनजोत कौरने झेल टिपला आणि भारताच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर, दीप्तीच्या दुसऱ्या चेंडूवर कर्णधार हरमनप्रीत कौरने कपिल देवच्या शैलीत धावत क्लार्कचा झेल घेतला आणि टीम इंडिया विश्वविजेती बनली. कौर, सूर्यकुमार आणि कपिल देव यांनी घेतलेले हे तीन तीन झेल प्रत्येक भारतीयाच्या आठवणीत वर्षानुवर्षे कोरले जातील. कोणताही सामना जिंकण्यासाठी झेल आवश्यक असतात, परंतु भारत अंतिम फेरीत ट्रॉफी उंचावण्यासाठी अविश्वसनीय झेल पकडतो आणि हेच प्रत्येक विश्वचषक विजयाची साक्ष देतो हेच यावरून अधोरेखित होते.

follow us