अबब! मुंबईतल्या ओपन बस परेडवर क्रिकेट आइसलँडचे मजेदार ट्विट म्हटले ही संख्या तर आपल्या…

अबब! मुंबईतल्या ओपन बस परेडवर क्रिकेट आइसलँडचे मजेदार ट्विट म्हटले ही संख्या तर आपल्या…

Indian Cricket Team Victory Parade: भारतीय संघाने (Team India) अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये शानदार कामगिरी करत तब्बल 17 वर्षानंतर T20 विश्वचषक चॅम्पियन बनला आहे.

टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) 7 धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले होते. काल 4 जुलै रोजी भारतीय संघ मायदेशी परतला आहे. त्यामुळे बीसीसीआयकडून (BCCI) वानखेडे स्टेडियमवर बीसीसीआयने भारतीय संघाचा सत्कार करण्यात आला. बीसीसीआयकडून भारतीय संघाला 125 कोटी रुपयांचा चेक दिला.

तर त्यापूर्वी भारतीय संघाची मरीन ड्राइव्हपासून वानखेडे स्टेडियमपर्यंत विजय मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत भारतीय संघासह लाखोच्या संख्येने चाहते उपस्थित होते. सध्या या मिरवणुकीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.

या मिरवणुकीचे फोटो आणि व्हिडिओ पाहून आता क्रिकेट आइसलँडकडून (Cricket Iceland) एक जबरदस्त ट्विट करण्यात आला आहे. हे ट्विट देखील सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “भारताच्या वर्ल्ड कप पार्टीच्या या फोटोमध्ये, आपण आपल्या राष्ट्रीय लोकसंख्येपेक्षा 20 पट जास्त लोक पाहू शकता.” सध्या सोशल मीडियावर या ट्विटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे.

4 जुलै रोजी मरीन ड्राइव्हपासून वानखेडे स्टेडियमपर्यंत भारतीय संघाने विजय मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीत लाखो लोक उपस्थित होते. भारतीय संघ 4 जुलै रोजी सकाळी दिल्ली येथे पोहोचला होता. त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची भेट घेऊन भारतीय संघाचा मुंबईत आगमन झाला होता आणि त्यानंतर भारतीय संघाची मरीन ड्राइव्हपासून वानखेडे स्टेडियमपर्यंत शानदार विजय मिरवणूक निघाली होती.  ज्यामध्ये लाखोंच्या संख्येने क्रिकेट प्रेमींनी सहभाग घेतला होता.

EWS, SEBC आणि OBC विद्यार्थिनींना दिलासा, मिळणार मोफत शिक्षण, सरकारचा निर्णय

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज