EWS, SEBC आणि OBC विद्यार्थिनींना दिलासा, मिळणार मोफत शिक्षण, सरकारचा निर्णय
Maharashtra Cabinet Meeting : आज राज्य मंत्रिमंडळाची एक महत्वाची बैठक पार पडली आहे. राज्य सरकारकडून या बैठकीत काही महत्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार, राज्य सरकारने या बैठकीत निर्णय घेत व्यावसायिक अभ्यासक्रमाचं शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी मोठी घोषणा केली आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार आता व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या ईडब्ल्यूएस (EWS), एसईबीसी (SEBC) आणि ओबीसी (OBC) मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे.
यापूर्वी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्याईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि ओबीसी मुलींना 50 टक्के सूट देण्यात येत होती मात्र आता सरकारच्या या निर्णयानुसार आता 100 सूट व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या मुलींना मिळणार आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे डब्ल्यूएस, एसईबीसी आणि ओबीसी विद्यार्थीनींच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे. काही दिवसापूर्वीच सरकारने मुलींच्या मोफत शिक्षणाची घोषणा केली होती.
तर दुसरीकडे मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाच्या या बैठकीत सभापती निवडीबाबतही चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या विधान परिषदेचं सभापती पद रिक्त आहे. त्यामुळे उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) कार्यवाहू सभापती आहे. त्यामुळे या बाबत लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
भारीच ना …, फक्त 95 हजारात खरेदी करता येणार देशातील पहिली CNG Bike, जाणून घ्या फीचर्स
महायुतीमध्ये विधान परिषदेच्या सभापती पदाच्या उमेदवारीवर भाजप ठाम आहे. माहितीनुसार, या पदासाठी प्रवीण दरेकर, राम शिंदे आणि निरंजन डावखरे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
गळ्यात कांद्याची माळ घालत बैलगाडीत लंकेंचं आंदोलन; ‘दिशाभूल’चा ठपका ठेवत विखेंवर टीकास्त्र