हिंदुस्तान कॉपर लिमिडेटमध्ये ‘या’ पदांसाठी भरती, महिन्याला मिळणार एक लाखांहून अधिक पगार
Hindustan Copper Limited Recruitment 2024 :तुम्ही सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, हिंदुस्तान कॉपर लिमिटेडने (Hindustan Copper Limited) नुकतीच काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीअंतर्गत कनिष्ठ व्यवस्थापक (Junior Manager) पदांसह अन्य रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. दरम्यान, या भरतीसाठी अर्ज कऱण्याची शेवटची तारीख किती? शैक्षणिक पात्रता काय? याच विषयी जाणू घऊ.
Ashvini Mahangade : सौंदर्य क्वीन, अश्विनीच्या नऊवारी साडीतील लुकने वेधले लक्ष
1 जुलैपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै 2024 आहे.
एकूण पदे – 56
पदाचे नाव आणि रिक्त पदांची संख्या
ज्युनिअर मॅनेजर
1) माइनिंग – 46
2) इलेक्ट्रिकल – 6
3) कंपनी सेक्रेटरी – 2
4) वित्त – 1
5) एचआर – 1
शैक्षणिक पात्रता-
1) माइनिंग/इलेक्ट्रिकल डिप्लोमा आणि पाच वर्षाचा अनुभव
किंवा
2) माइनिंग/विद्युत अभियांत्रिकीची पदवी आणि 2 वर्षांच्या अनुभव
3) कोणत्याही शाखेतील पदवी आणि 5 वर्षांचा अनुभव
किंवा
4) CA किंवा PG पदवी/डिप्लोमा (फायनान्स/एचआर) पीजी एमबीए (फायनान्स/एचआर) आणि 2 वर्षांचा अनुभव
पुढची दहा वर्ष शिंदेच मुख्यमंत्री हवे; दोन वर्ष पूर्ण होताच पिळगावकर-कोठारेंकडून स्तुतीसुमनं
वयोमर्यादा-
1 जून 2024 रोजी उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे निश्चित करण्यात आली. वय यापेक्षा जास्त असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही. SC, ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्षे आणि OBC उमेदवारांसाठी 3 वर्षे वयाची सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण: कोलकाता
अर्ज फी-
सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस: रु 500
SC/ST: कोणतेही शुल्क नाही
पगार-
या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना 30 हजार रुपये ते 1 लाख 20 हजार रुपये वेतन दिले जाईल.
अधिकृत संकेतस्थळ-
https://www.hindustancopper.com/
अधिसूचना-
https://www.hindustancopper.com/Upload/Notice/0-638549381307846250-hindinoticeFILE.pdf
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक
https://www.hindustancopper.com/Page/
अर्ज कसा करायचा?
1. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम http://www.hindustancopper.com या वेबासाईटवर जावे.
2. त्यानंतर HCL Recruitment 2024 या पर्यायावर क्लिककरावे.
3. अर्जात विचारले जाणारे सर्व तपशील योग्य पद्धतीने भरावे.
4. अर्ज भरतांना चुकीची माहिती भरू नये अन्यथा अर्ज नाकारले जातील.
5. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
6. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून स्वत: जवळ ठेवावी.
उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच अर्ज सादर करणे आवश्यक आहे. उशीरा आलेले अर्ज नाकारले जातील, याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.