पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, नाबार्डमध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या १५० जागांसाठी भरती
NABARD Bharati 2023 : केंद्र आणि राज्य लोकसेवा आयोगाव्यतिरिक्त अनेक महत्त्वाच्या सरकारी नोकऱ्या जास्त पगाराच्या आणि प्रतिष्ठेच्या आहेत. त्यासाठी जर प्रयत्न केले तर सुशिक्षित पदवीधरांना आयुष्याचे सोनं करता येणं शक्य आहे. तुम्ही सरकारी नोकरीच्या (Job) शोधात असाल आणि बॅंकिंग क्षेत्रातील (Banking job) नोकरी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) ने अलीकडे सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) (ग्रेड A) च्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
https://www.youtube.com/watch?v=3UoWv9XTJzE
सुमारे दीडशे जागांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.2 सप्टेंबर पासून या भरतीसाठी अर्ज करायला सुरूवात झाली आहे. या भरतीसाठी अनुसूचित जाती, जमाती आणि अपंग व्यक्तींसाठी अर्ज शुल्क 150 रुपये आणि इतरांसाठी परीक्षा शुल्क 800 रुपये आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट आहे.
याशिवाय या पदभरतीसाठी अर्ज करण्यासाठी उदेवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असावा. उमेदवारांनी संबंधित पदाच्या सर्व अटी व शर्ती पूर्ण केल्या पाहिजेत.
Chandrashekhwar Bawankule : ‘2024 नंतर विरोधकांकडे विरोधी पक्षनेताच राहणार नाही’…
सहाय्यक पदासाठी उमेदवारांची निवड ही दोन टप्यात होणार आहे. सुरुवातीला पूर्वपरीक्षा होईल. नंतर यात उत्तीर्ण होणाऱ्या उमदेवारांसाची मुख्य परीक्षा घेतली जाईल. पूर्वपरीक्षा ही 16 ऑक्टोबर रोजी होणार आहे. उमेदवारांना विहित नमुन्यात ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार माहितीसाठी अधिकृत वेबसाइट nabard.org ला भेट द्यावी.
या पदासाठी अर्ज करताना उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. कारण, अर्ज करताना काही त्रुटी आढळल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर अर्ज प्राप्त झाल्यास अर्ज नाकारला जाईल. अर्ज करताना, उमेदवारांना अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.