Chandrashekhwar Bawankule : ‘2024 नंतर विरोधकांकडे विरोधी पक्षनेताच राहणार नाही’…

Chandrashekhwar Bawankule : ‘2024 नंतर विरोधकांकडे विरोधी पक्षनेताच राहणार नाही’…

Chandrashekhwar Bawankule : 2024 च्या निवडणुकांनंतर विरोधकांकडे विरोधी पक्षनेताच राहणार नसल्याची टीकेची तोफ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhwar Bawankule) यांनी डागली आहे. अहमदनगरमध्ये आयोजित एका कार्यक्रमाला चंद्रशेखर बावनकुळेंनी(Chandrashekhwar Bawankule ) हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना बावनकुळेंनी(Chandrashekhwar Bawankule) विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

Nagpur : पूरग्रस्तांसाठी मोठा निर्णय; सरकार तातडीने देणार आर्थिक मदत

पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले, ज्या सरकारकडे 2025 चं बहुमत नाही, विरोधकांचे आमदार आजही आमच्याकडे येण्यास तयार आहेत, त्यांची यादी तयार असून निवडणुकीपर्यंत आमचं बहुमत 225 च्या पुढे जाणार असून निवडणुकीतनंतर विरोधकांकडे विरोधी पक्षनेताच राहणार नसल्याचं बावनकुळे म्हणाले आहेत.

India vs Canada : 8 लाख मतांच्या लोण्यासाठी जस्टिन ट्रूडो घेतायत भारताशी पंगा…

तसेच भारताच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास आहे, त्यामुळे अहमदनगरमधून आमचे 12 आमदार व 2 खासदार आमचे प्रचंड बहुमताने निवडून येणार असल्याचा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

Single: प्रथमेश अन् अभिनय पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र; ‘या’ सिनेमात हास्याचा धमाका!

जिल्हा पातळीचा वाद राज्य पातळीवर सोडवणार :
शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात भाजपमध्ये गटबाजी सुरु असल्याच्या चर्चा आहेत. भाजपमध्ये लोकशाहीला बहुमत आहे. या वादावर कार्यकर्त्यांच काय मत आहे याचा विचार केला जाणार आहे. काही वाद निर्माण झालेले असतील तर ते सोडवण्यासाठी राज्य पातळीवर निर्णय घेतला जाईल. शेवटी भाजपचं एकच पार्लिमेंट बोर्ड असून बोर्डानूसार निर्णय घेतले जातात. आमच्या संघटनेमध्ये मतभेद असतात मात्र को,णीही राजीनामे देत नाहीत, आम्ही सर्व जण यावर बसून घेणार आहोत.

नार्वेकर योग्यच निर्णय घेतील :
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अत्यंत निकनाथ वकील आहेत, नियमाप्रमाणे आणि विधानमंडळाच्या ज्या काही आतापर्यंतच्या पद्धती परंपरा आहे निकाल आहेत. त्याप्रमाणे पुढे जातील खरंतर या ठिकाणी लवकरात लवकर निर्णय लागणार, असं न्यायालयाने म्हटलंय, नार्वेकर योग्य तो निर्णय घेतील, असा आम्हाला विश्वास असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube