भारीच ना …, फक्त 95 हजारात खरेदी करता येणार देशातील पहिली CNG Bike, जाणून घ्या फीचर्स
Bajaj Freedom 125 : भारतीय बाजारात बजाजने (Bajaj) मोठा धमाका करत देशातील पहिली सीएनजी बाइक (CNG Bike) लाँच केली आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात कंपनीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते ही बाइक लाँच केली आहे. Bajaj Freedom 125 या नावाने ही बाइक भारतीय बाजारात लाँच करण्यात आली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Bajaj Freedom 125 मध्ये 125cc इंजिन देण्यात आला आहे तसेच या बाइकमध्ये सीएनजीसह पेट्रोलचा देखील पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही सहज ही बाइक सीएनजीवरून पेट्रोलवर आणि पेट्रोलवरून सहज सीएनजीवर स्विच करू शकतात. तसेच ही बाइक देशात सर्वाधिक मायलेज देणार असा दावा देखील कंपनीकडून करण्यात आला आहे.
Freedom 125 भारतीय बाजारात Honda Shine 125, Hero Glamour, TVS Raider 125, Hero Xtreme 125R, यासह इतर 125 cc बाइक्सना टक्कर देऊ शकते.
Bajaj Freedom 125 डिझाईन
कंपनीकडून या बाइकमध्ये एलईडी हेडलाइट्स आणि टर्न इंडिकेटर देण्यात आहे आहे. याच बरोबर एक लांबलचक सिंगल-सीट देण्यात आला आहे ज्याच्या खाली सीएनजी टाकी लावण्यात आली आहे. ग्राहकांना या बाइकमध्ये 17-इंच व्हील्स आणि ट्यूबलेस टायर पाहायला मिळणार आहे. या बाइकमध्ये फ्रंट डिस्क आणि रिअर ड्रम कॉम्बो कॉम्बिनेशन आहे.
Bajaj Freedom 125 फीचर्स
ग्राहकांनाआकर्षित करण्यासाठी या बाइकमध्ये पेट्रोल आणि सीएनजी पर्याय देण्यात आला आहे. सीएनजीमधून पेट्रोल आणि पेट्रोलमधून सीएनजीमध्ये स्विच करण्याचा पर्याय देखील या बाइकमध्ये देण्यात आला आहे. तुम्हाला या बाइकमध्ये सुरक्षित टँक, राऊंड हेडलाइट, हँडलबार ब्रेसेस, नकल गार्ड आणि फ्रंट डिस्क ब्रेक पाहायला मिळणार आहे. याच बरोबर ग्राउंड क्लिअरन्स आणि एडव्हेंचर स्टाइल देण्यात आला आहे. स्टायलिश बेली पॅन, 5-स्पोक अलॉय व्हील्स, पिलियनसाठी मजबूत ग्रॅब रेल, रिब्ड सीट, टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, रियर मोनो-शॉक सेटअप, टायर हगर देखील कंपनीकडून ऑफर करण्यात आले आहे.
Bajaj Freedom 125 मायलेज
कंपनीने या बाइकमध्ये 125cc इंजिन दिले आहे. यात तुम्हाला 2 किलोची CNG टाकी आणि 2 लिटरची पेट्रोल टाकी देण्यात आली आहे. कंपनीनुसार ही बाइक तब्बल 330 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते.
Bajaj Freedom 125 किंमत
कंपनीने Bajaj Freedom 125 तीन व्हेरियंटमध्ये लाँच केले आहे. या तिन्ही व्हेरियंटची किंमत खालीप्रमाणे आहे (किंमत एक्स शोरूम)
Freedom 125 NG04 Drum- 95,000 रुपये
Freedom 125 NG04 Drum LED – 1 लाख 05 हजार रुपये
वानखेडेवर टीम इंडियाचा जल्लोष अन् बुमराहने केला सर्वात मोठा खुलासा
Freedom 125 NG04 Disc LED – 1 लाख 10 हजार रुपये