वानखेडेवर टीम इंडियाचा जल्लोष अन् बुमराहने केला सर्वात मोठा खुलासा

वानखेडेवर टीम इंडियाचा जल्लोष अन् बुमराहने केला सर्वात मोठा खुलासा

Team India Victory Parade : अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक 2024 चे (T20 World Cup 2024) विजेतेपद पटकावल्यानंतर आज भारतीय संघ (Team India) मायदेशी परतली आहे. मुंबईत भारतीय संघाच्या स्वागतासाठी लाखोंच्या संख्येने क्रिकेट चाहते उपस्थित आहे.

मरीन ड्राइव्हपासून वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium) पर्यंत भारतीय संघाची विजयी मिरवणूक निघाली होती. वानखेडे स्टेडियमवर बीसीसीआयने (BCCI) विश्वविजेता भारतीय संघाचा सत्कार केला आणि संपूर्ण संघाला 125 कोटी रुपयांचा चेक दिला. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली होती. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) ही ट्रॉफी देशाला समर्पित केली आहे.

यावेळी रोहित शर्मा म्हणाले की, मला ट्रॉफी जिंकून खूप आनंद झाला आहे.  विश्वचषकातील प्रत्येक सामना जिंकणे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. मला खूप आनंद होत आहे की मी प्रत्येक भारतीयांचे स्वप्न पूर्ण करू शकलो.

बुमराहने देशाला सर्वात मोठे गिफ्ट दिले

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) म्हणाला की, जसप्रीत बुमराहने देशाला सर्वात मोठे गिफ्ट दिले. त्याच्या सारखा गोलंदाज फक्त एकदाच येतो. तो जगातील 8 वे आश्चर्य आहे. त्याची गोलंदाजी अप्रतिम आहे, त्याने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्यामुळे भारतने ट्रॉफी जिंकली असं देखील तो म्हणाला.

जसं तुम्हाला वाटत होते की हा सामना हातातून गेला असा आम्हालाही वाटत होतो मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये आम्ही सामन्यात कमबॅक केला. असं कोहली म्हणाला. तसेच जेव्हा आम्ही 2011 मध्ये विश्ववि़जेता बनलो होतो तेव्हा संघातील अनेक वरिष्ठ खेळाडू रडत होते मात्र तेव्हा मी विचार करत होतो हे इतका का? रडत आहे मात्र आज मी जेव्हा ही ट्रॉफी जिंकली आहे तेव्हा मला कळलं की त्यावेळी ते इतका का रडत होते. असं देखील तो म्हणाला.

वानखेडे माझ्यासाठी खास : जसप्रीत बुमराह

यावेळी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) म्हणाला वानखेडे माझ्यासाठी खूप खास आहे. या मैदानावरून मी माझ्या आयपीएल करिअरला सुरुवात केली होती. भारतीय क्रिकेटला पुढे नेणे हे आपल्या सर्वांचे लक्ष्य आहे.  मी कोणत्याही सामन्यानंतर रडत नसतो मात्र फायनलनंतर माझ्या डोळ्यात अश्रू येत होते असं बुमराह म्हणाला.

Video: विश्वविजेता टीम इंडियाची विजय मिरवणूक , वानखेडे हाउसफुल, पहा व्हिडिओ

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज