गावस्कर, सचिनला जे जमलं नाही ते रोहित शर्माने करून दाखवलं, खास विक्रमांवर कोरलं नाव

गावस्कर, सचिनला जे जमलं नाही ते रोहित शर्माने करून दाखवलं, खास विक्रमांवर कोरलं नाव

Rohit Sharma : आज T20 विश्वचषक 2024 चा (T20 World Cup 2024) दुसरा सेमीफायनल सामना भारत आणि इंग्लंड (Ind vs Eng) यांच्या दरम्यान गयानाच्या प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रथम फलंदाजी करताना भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पुन्हा एकदा आपल्या स्टाईलमध्ये भारताला धमाकेदार सुरुवात देण्याचा प्रयत्न केला. सध्या हा सामना पावसामुळे थांबला आहे. पावसामुळे खेळ थांबला तोपर्यंत भारताने दोन गडी बाद 65 धावा केल्या होत्या. सध्या रोहित आणि सूर्यकुमार यादव क्रीजवर आहेत.

तर दुसरीकडे या सामन्यात 24 धावा करत रोहितने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आह. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आणि कपिल देव यांनाही त्यांच्या कारकिर्दीत ही कामगिरी करता आली नाही जी रोहित शर्माने केली आहे. या सामन्यात 24 धावा करून रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5000 धावा करणारा 5वा भारतीय कर्णधार ठरला आहे. या लिस्टमध्ये विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे.

कोहलीने 213 सामन्यांच्या 250 डावांमध्ये 59.92 च्या सरासरीने 12883 धावा केल्या आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर महेंद्रसिंग धोनी आहे, ज्याने 332 सामन्यांच्या 330 डावांमध्ये 11207 धावा केल्या आहेत. मोहम्मद अझरुद्दीन या यादीत तिसऱ्या आणि सौरव गांगुली चौथ्या स्थानावर आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार

विराट कोहली: 12883 धावा

एमएस धोनी: 11207 धावा

मोहम्मद अझरुद्दीन : 8095 धावा

सौरव गांगुली : 7643 धावा

रोहित शर्मा: 5000* धावा

सचिन तेंडुलकर: 4508 धावा

राहुल द्रविड : 4394 धावा

सुनील गावस्कर : 4151 धावा

कपिल देव: 2928 धावा

मोठी बातमी! ‘या’ स्मार्टफोन्सवर चालणार नाही व्हॉट्सॲप, पहा संपूर्ण लिस्ट

आतापर्यंत रोहित शर्माने कर्णधार म्हणून आतापर्यंत 16 कसोटी सामने खेळले असून यामध्ये त्याने 41.92 च्या सरासरीने 1090 धावा केल्या आहेत तर एकदिवशी क्रिकेटमध्ये रोहितने कर्णधार म्हणून 45 सामने खेळले आहेत यामध्ये त्याने 55.32 च्या सरासरीने 2047 धावा केल्या आहेत तर 61 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने रोहित कर्णधार म्हणून खेळले आहे आणि 34.74 च्या सरासरीने त्याने 1876 धावा केल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube